‘या’ कारणासाठी सुशांतच्या बहिणीची पुन्हा एकदा होणार पोलीस चौकशी

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३४ जणांचा जबाब नोंदवला आहे.

Sushant Singh Rajput
सुशांत सिंह राजपूत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस पुन्हा एकदा सुशांतची बहिणीला चौकशीसाठी बोलावणार आहेत. सुशांत आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या नातेसंबंधाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ते बहिणीला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावणार आहेत. ‘टाइम्स नाऊ’ने यासंदर्भातील माहिती दिली. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३४ जणांचा जबाब नोंदवला आहे.

सुशांतच्या बहिणीसोबतच त्याच्या स्वयंपाक्यालाही पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. आत्महत्येच्या दोन दिवस आधी सुशांत कसा होता आणि त्याने काय काय केलं, याबद्दल पोलिसांना जाणून घ्यायचं आहे. सुशांतची बहिणी आणि स्वयंपाक्याची याआधीही चौकशी झाली होती. त्याचसोबत रिया चक्रवर्ती, महेश शेट्टी, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, मुकेश छाबडा यांचीही चौकशी झाली.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मुंबई पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहेत. रिया आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं. सुशांतचं रियासोबत नातं कसं होतं हे पोलिसांना जाणून घ्यायचं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर रियाला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तिला बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्याही येऊ लागल्या आहेत. याविरोधात तिने सायबर सेलकडे तक्रारदेखील केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sushant singh rajput case mumbai police to question actors sister to know more about his personal life ssv

ताज्या बातम्या