केरळनंतर नागालँडच्या मदतीला धावला ऑनस्क्रिन धोनी

नागालँडचे मुख्यमंत्री निम्फ्यू रिओ यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुशांतचे आभार मानल्याचं पाहायला मिळालं आहे.

सुशांत सिंह राजपूत

काही दिवसापूर्वी केरळवर ओढावलेल्या नैसर्गिक संकटामधून येथील नागरिकांची मदत करण्यासाठी अनेक स्तरांमधून मदत करण्यात आली. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे राहिले नव्हते. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आर्थिक मदत केल्याचं पाहायला मिळालं. त्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेही त्याच्यापरीने शक्य होईल तेवढी मदत केली होती. त्यानंतर आता सुशांत पुन्हा एकदा त्याच्या मदतीचा हात पुढे केला असून यावेळी त्याने नागालँडला मदत केली आहे.

नागालँडमध्ये काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. २६ जुलैपासून सुरु असलेल्या पावसाचा फटका बसला असून ५ हजार ३८६ कुटुंब बेघर झाले आहेत. त्यामुळे सध्या नागालँडच्या मदतीसाठी अनेक जण मदत करत आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूतनेही मदत निधीच्या माध्यमातून नागालँडच्या नागरिकांसाठी १ कोटी २५ लाख रुपयांची मदत केली आहे. विशेष म्हणजे नागालँडचे मुख्यमंत्री निम्फ्यू रिओ यांनी ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

नागालँडचे मुख्यमंत्री निम्फ्यू रिओ यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुशांतचे आभार मानल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘सुशांत सिंह राजपूत याने स्वत: माझी भेट घेऊन नागालँडच्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये १ कोटी २५ लाख रुपयांची मदत केली आहे’,असं निम्फ्यु यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री निम्फ्यू रिओ यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागालँडला मदत करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सुशांतने ही मदत केल्याचं पाहायला मिळत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sushant singh rajput donates rs 1 25 crore towards cm relief fund for nagaland floods

ताज्या बातम्या