बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतरच्या ड्रग्स प्रकरणाचा तपास मागच्या दोन वर्षांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो करत असून आता त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि अन्य काहींच्या विरोधात मुख्य आरोपी म्हणून न्यायालयात खटला दाखल केला आहे. संपूर्ण तपासात एनसीबीनं सुशांतसाठी ड्रग्स विकत घेणे आणि त्याला ते पुरवल्याबद्दल रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविकसह अन्य काहींना या प्रकरणात मुख्य आरोपी ठरवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष सरकारी वकील अतुल सरपंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपींवर चार्जशीटवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांनी ही ड्राफ्ट चार्जशीट दाखल करुन घेताना सांगितलं, ‘अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी ड्रग्सचा वापर केला होता आणि सुशांतसिंह राजपूतसाठी त्यांनी याची खरेदी केली होती.’ याशिवाय न्यायालयाकडून सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले जाणार होते, मात्र काही आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल केल्याने तसे होऊ शकले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा- “सेल…सेल…सेल…एमएलए ले लो…” महाराष्ट्रातील राजकीय पार्श्वभूमीवर ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

दरम्यान जोपर्यंत दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत काही आरोपींवरील आरोप निश्चित करता येणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीसाठी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती न्यायालयात हजर होते. विशेष न्यायाधीश व्ही जी रघुवंशी आता १२ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तपासात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. जवळपास १ महिना तुरुंगात राहिल्यानंतर रियाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं मान्य केला होता. सुशांतसिंह राजपूतनं १४ जून २०२० रोजी मुंबईतील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणाला आता २ वर्ष झाली आहेत. मात्र यावर अद्याप एनसीबीकडून तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput drugs case ncb file charge shit against rhea chakraborty mrj
First published on: 23-06-2022 at 08:57 IST