PHOTOS : अंतराळवीर होण्यासाठी सुशांतची तयारी सुरु

नासामध्ये सुशांत सिंग राजपूत घेतोय प्रशिक्षण

sushant singh rajput
सुशांत सिंग राजपूत

‘काय पो छे’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत Sushant Singh Rajput अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. गेल्याच महिन्यात त्याचा ‘राबता’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता सुशांत त्याच्या आगामी ‘चंदा मामा दूर के’ चित्रपटासाठी जोरदार तयारी करताना दिसतोय. यासाठी तो सध्या नासामध्ये (नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनीस्ट्रेशन) प्रशिक्षण घेतोय.

व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरवर सुशांतचा फोटो शेअर केलाय. या फोटोंमध्ये सुशांत अंतराळवीराच्या वेशभूषेत पाहायला मिळतोय. या प्रशिक्षणासाठीच सुशांत आयफा पुरस्कार सोहळ्यानंतर थेट वॉशिंग्टन डीसी येथील नासाच्या कार्यालयात पोहोचला. याआधी सुशांतने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. ‘मी अंतराळात जावं अशी माझ्या आईची इच्छा होती,’ असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं होतं.

वाचा : इशा कोप्पीकरसंदर्भात इंदर कुमारच्या पहिल्या पत्नीने केला हा खुलासा

‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आर. माधवन यांच्याही भूमिका आहेत. नवाजदेखील अंतराळवीराच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. मुंबई, हैद्राबाद, दिल्ली आणि इंटरनॅशनल स्टुडिओमध्ये याचं शूटिंग होईल. संजय पूरण सिंह चौहान चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून विकी रजानी याची निर्मिती करतील. पुढच्या वर्षी २६ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sushant singh rajput preparing for his space adventure film chanda mama door ke