सुशांतचा सलमान विषयी बोलतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ पुरस्कार सोहळ्यातील असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या आठवणीमध्ये चाहत्यांनी अनेक जुने व्हिडीओ आणि फोटो शेअर केले. आता सुशांतचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत सलमान विषयी बोलताना दिसत आहे.

फिल्मीज्ञान या इन्स्टाग्राम पेजने सुशांतचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एखाद्या पुरस्कार सोहळ्यातील असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओमध्ये सुशांत सलमान विषयी बोलताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

He was so nervous while Salman was right behind him, this is called respecting your seniors Sweet memories of Sush

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan) on

व्हिडीओमध्ये सुशांतने काळ्या रंगाचा कोट परिधान केला असून तो हॅण्डसम दिसत आहे. दरम्यान त्याला सलमान खानविषयी विचारले जाते. तेव्हा सुशांत सलमान हा एक सुपरस्टार असल्याचे म्हणतो. तसेच सुशांत सलमानचा किती आदर करत होता हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

तसेच हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, ज्यावेळी सलमान त्याच्या पाठीउभा होता तेव्हा सुशांत थोडा नर्व्हस होता… याला म्हणतात मोठ्या कलाकाराबद्दल असलेला आदर असे कॅप्शन दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sushant singh rajput respect salman khan as cenior actor avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या