रियापेक्षा सुशांत आणि सारामध्ये चांगले बाँडिंग होते- मित्राचा खुलासा | Loksatta

रियापेक्षा सुशांत आणि सारामध्ये चांगले बाँडिंग होते- मित्राचा खुलासा

सॅम्युअल होकिपने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

रियापेक्षा सुशांत आणि सारामध्ये चांगले बाँडिंग होते- मित्राचा खुलासा

सध्या बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान हे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा सुशांतच्या जवळचा मित्र सॅम्युअल होकिपने केलेल्या एका पोस्टमुळे सुरु झाल्या. आता सॅम्युअलने एका मुलाखतीमध्ये सुशांत आणि साराचे बाँडिंग रिया चक्रवर्तीपेक्षा चांगले असल्याचे म्हटले आहे.

नुकतीच सॅम्युअलने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सुशांत आणि सारा विषयी माहिती दिली आहे. ‘सुशांत आणि साराचा ब्रेकअप झाला. त्यानंतर रिया सुशांतच्या आयुष्यात आली. मला नेहमी वाटायचे रियापेक्षा सुशांत आणि सारामध्ये चांगले बाँडिंग होते. जसं मी माझ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की ते दोघे एकमेकांचा आदर करायचे. त्या दोघांनी एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला. ते एकत्र नेहमी आनंदात असायचे’ असे सॅम्युअलने म्हटले.

सुशांत आणि साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच या चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले. अभिषकने सुशांतला ‘काई पो चे’ या चित्रपटातून लाँच केले होते. त्यामुळे त्यांनी केदारनाथ या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केले. केदारनाथ चित्रपटाच्या वेळी सुशांत आणि साराच्या अफेअरच्या रंगल्या होत्या. पण या चित्रपटानंतर ते कोणत्याही इवेंटमध्ये एकत्र दिसले नाहीत.

काय होती सॅम्युअलची पोस्ट?

मला आजही आठवते केदारनाथ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सुशांत आणि सारा एकमेकांच्या प्रेमात होते. ते एकमेकांचा आदरही करायचे आणि हा आदर फार कमी रिलेशनशीपमध्ये पाहायला मिळतो. सारा सुशांतसोबतच त्याच्या कुटुंबीयांचा, मित्रांचा तसेच त्याच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करायची. मात्र सुशांतचा सोनचिडिया हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अचानक साराने ब्रेकअप केला. त्यांच्या ब्रेकअपचे कारण मला आजही समजले नाही. त्यांचा ब्रेकअप बॉलिवूड माफियांच्या दबावामुळे झाला असावा या आशयाची पोस्ट सॅम्युअलने केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-08-2020 at 16:31 IST
Next Story
महागड्या वकिलांना फी देण्यासाठी स्पॉन्सर कोण?; शेखर सुमन यांचा रियाला सवाल