सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात कोर्टात याचिका दाखल

रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

Rhea
सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात बिहार कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. मुजफ्फरपूरमध्ये राहणारे कुंदन कुमार यांनी मुख्य न्यायिक दंडाधिकारी यांच्याकडे ही याचिका दाखल केली आहे. कुंदन कुमार हे सुशांतचे चाहते आहे. या याचिकेवर २४ जून रोजी सुनावणी होणार आहे. रियाने सुशांतचा आर्थिक व मानसिक छळ केल्याचा आरोप कुमार यांनी केला आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुजफ्फरपूरमधील सीजीएम कोर्टात ही दुसरी याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधी वकील सुधीर कुमार यांनी सलमान खान, आदित्य चोप्रा, करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. त्यांनी आतापर्यंत १५ लोकांचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये रियाचाही समावेश आहे. शुक्रवारी पोलिसांनी रियाची जवळपास ११ तास चौकशी केली. “सुशांतने कधीही त्याच्या समस्या इतर कोणाला सांगितल्या नाहीत. तो नैराश्यामध्ये असल्याचे निदान झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याने डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेणेही बंद केले होते. काही वेळा सुशांत स्वत:ला खोलीमध्ये बंद करुन घ्यायचा व तासनतास रडत बसायचा” असे रियाने पोलिसांना सांगितले. सुशांत बरोबर तिची ओळख कधी झाली? तसेच त्यांच्या नात्याबद्दलही तिने पोलिसांना सांगितले. रियाच्या स्टेटमेंटनुसार २०१३ साली सुशांत ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटासाठी शूटिंग करत असताना तिची पहिल्यांदा त्याच्याबरोबर ओळख झाली. त्यावेळी ‘रिया ‘मेरे डॅडी की मारुती’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sushant singh rajput suicide case filed against rhea chakraborty ssv

ताज्या बातम्या