बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांचं काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झालं आहे. सुष्मितानं इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट लिहून चाहत्यांना रोहमनपासून वेगळं झाल्याची माहिती दिली होती. यावेळी आपल्या सोशल मीिडया पोस्टमध्ये ‘आमची मैत्री कायम राहील’ असं सुष्मितानं म्हटलं होतं. त्यानंतरही आता हे दोघंही एकत्र दिसले आहेत. सोशल मीडियावर सध्या या दोघांचे फोटो चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत.

ब्रेकअपनंतरही सुष्मिता आणि रोहमन यांच्यात चांगली मैत्री कायम आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमधून दिसून येतं. ब्रेकअपनंतर सुष्मिता आणि रोहमन एकत्र दिसले. पण यावेळी रोहमनच्या कृतीनं मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सुष्मिता आणि रोहमन एकाच गाडीतून जाताना दिसले. मात्र फोटोग्राफर्सना पाहून रोहमननं मात्र खाली झुकून स्वतःचा चेहरा लपवला. पण सुष्मिता मात्र हसून फोटोग्राफर्सना पोझ देताना दिसली.

pet dog helped the owner to plant a tree Emotional Video
अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल
future players in indian cricket team
विश्लेषण : टीम इंडिया ‘जनरेशन नेक्स्ट’ कशी असेल?
Sajjad lone baramulla loksabha
Loksabha Election: बारामुल्लामधून पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत सज्जाद लोन?
foreigner guy making kanda poha viral video
Video : वाह! फॉरेनर दाखवतोय महाराष्ट्रीयन ‘कांदे-पोहे’ रेसिपी! “आम्हाला मुलगा पसंत आहे!” म्हणाले नेटकरी

दरम्यान अभिनेत्री सुष्मिता सेननं तिच्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच बिनधास्तपणे बोलताना दिसली आहे. २०१८ मध्ये जेव्हा सुष्मितानं स्वतः पेक्षा वयाने लहान असलेल्या रोहमन शॉलला डेट करायला सुरुवात केली तेव्हाही तिनं आपल्या नात्याबाबत कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नव्हती आणि आता रोहमनशी ब्रेकअप झाल्यानंतरही सुष्मितानं सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही गोष्टही मान्य केली.

सुष्मिता सेनच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अलिकडेच ‘आर्या’ वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती. मागच्या वर्षी या वेब सीरिजचा पहिल्या सीझनमधून सुष्मितानं अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं होतं. या वेबसीरिजमध्ये तिचा दमदार अभिनय पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या अभिनयासाठी तिचं खूप कौतुकही झालं होतं.