sushmita sen brother rajeev allegation on wife charu asopa again | "मुलीला भेटू देत नाही..." सुष्मिता सेनच्या भावाचा पत्नीवर गंभीर आरोप, चारू असोपाने दिलं स्पष्टीकरण | Loksatta

“मुलीला भेटू देत नाही…” सुष्मिता सेनच्या भावाचा पत्नीवर गंभीर आरोप, चारू असोपाने दिलं स्पष्टीकरण

राजीवच्या म्हणण्यानुसार चारू त्याला त्याच्या मुलीला भेटू देत नाही. त्यानंतर चारू असोपानेही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे

“मुलीला भेटू देत नाही…” सुष्मिता सेनच्या भावाचा पत्नीवर गंभीर आरोप, चारू असोपाने दिलं स्पष्टीकरण
चारू असोपाने राजीवच्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ आणि त्याची पत्नी चारू असोपा यांच्यातील वाद आता कोणापासून लपून राहिलेले नाहीत. मागच्या काही महिन्यांमध्ये दोघांनीही एकमेकांवर बरेच आरोप केलेले आहेत. अशात आता पुन्हा एकदा राजीव सेनने चारू असोपावर नवे आरोप लावले आहेत. राजीवच्या म्हणण्यानुसार चारू त्याला त्याच्या मुलीला भेटू देत नाही. त्यानंतर चारू असोपानेही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिने राजीवच्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

चारूने तिच्या ब्लॉगमध्ये राजीव सेनचे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर तिने राजीव सेन घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यासाठीही आलेला नाही असंही म्हटलं आहे. चारू म्हणाली, “नेहमीप्रमाणे त्याने यावेळीही सांगितलेल्या दिवशी येणं टाळलं. त्याच्या या अशा वागण्यामुळे मी माझ्या बहिणीच्या लग्नालाही जाऊ शकले नाही. आम्ही ३० नोव्हेंबरला घटस्फोटाचे पेपर्स साइन करणार होतो. पण तो आलाच नाही. २४ तारीखला आम्ही भेटणार होतो आणि तेव्हाही तो भेटला नाही. तेव्हा त्याने ५ डिसेंबरला येणार असं सांगितलं होतं.”

आणखी वाचा- “मला घटस्फोट हवाय”; सुश्मिता सेनचा भाऊ पत्नी चारूवर गंभीर आरोप करत म्हणाला, “तिने माझ्या मुलीचा…”

चारू पुढे म्हणाली, “त्याच्यामुळे मला माझ्या बहिणीच्या प्री वेडिंग कार्यक्रमांना हजर राहू शकत नाहीये. मी माझे तिकिट्स कॅन्सल केले आहेत. कारण त्याने मला ५ डिसेंबर ही तारीख दिली होती. त्याला माहीत होतं की ८ तारीखला लग्न आहे. त्यामुळे त्याने ३० नोव्हेंबरला भेटणं टाळलं. मला वाटतं मी आता आता माझ्या बहिणीच्या लग्नाला अखेरच्या क्षणीच पोहोचणार आहे. मला त्यासाठी तिकीटही मिळेल की नाही माहीत नाही.”

आणखी वाचा-“मी गरोदर असताना तो बाहेर…” सुश्मिता सेनच्या भावाबद्दल पत्नीचा धक्कादायक खुलासा

दुसरीकडे राजीवने चारू असोपा त्याला त्याच्या मुलीला भेटू देत नसल्याचा आरोप केला आहे. त्याने सोशल मीडियावर मुलीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो मुलगी जियाना घेऊन फिरताना दिसत आहे. तिच्याबरोबर खेळताना दिसत आहे. एवढंच नाही तो आपल्या लेकीचा व्हिडीओही शूट करताना दिसत आहे. दरम्यान राजीव आणि चारू यांच्यात लग्नाच्या काही महिन्यांतच वाद होण्यास सुरुवात झाली होती. अशातच त्यांच्या मुलीचा जन्म झाला. पण तिच्या जन्मानंतर त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन दोघांनी अखेर घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 18:47 IST
Next Story
‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार राजूच्या भूमिकेत परतणार? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर