बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सुश्मिता ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सुश्मिताचे लाखो चाहते आहेत. सुश्मिता ४६ वर्षांची असून तिने लग्न केले नाही. पण सुश्मिताने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. एका मुलीचे नाव रेने आणि दुसऱ्या मुलीचे नाव अलिशा आहे. तर या दोनं मुली हेच तिचं आयुष्य आहे असं ती म्हणाली. यासोबत कितीतरी वेळा म्हटलं गेलं की, या मुलींमुळेच तिनं लग्न केलेलं नाही. पण यावेळी याविषयावर सुश्मितानं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

लग्नाबद्दल बोलताना सुष्मिता म्हणाली, “सुदैवाने मी काही चांगल्या पुरुषांना भेटले. मी लग्न न करण्यामागे एकच कारण होतं ते म्हणजे ते सगळे माझ्या अपेक्षांवर उतरले नाहीत. माझ्या मुलांशी त्याचा काहीही संबंध नव्हता. माझी मुलं कधीच लग्नाच्या मध्ये आली नव्हती. माझ्या दोन्ही मुलांनी माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींना मोठ्या मनाने स्वीकारले. त्यांनी प्रत्येकाला समान प्रेम आणि आदर दिला आहे.”

आणखी वाचा : “२०० बिहारी इथे उभे करीन…”, घरातल्याच कूकने पोटात चाकू खुपसण्याची अभिनेत्रीला दिली धमकी

सुश्मिता लग्नाविषयी बोलताना म्हणाली, “तीन वेळा असं झालंय की जवळ-जवळ लग्नाची सगळी तयारी झाली, जेव्हा लग्न होणारंच त्यावेळी असं काही घडलं की माझं नववधू बनायचं स्वप्न तिथेच मोडायचं. पण यासाठी माझ्या मुली नक्कीच कारणीभूत नाहीत.”

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

सुश्मिताचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला आहे. दोघं अजूनही चांगले मित्र आहेत. जेव्हा सुश्मिताने तिच्या ब्रेकअपची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती, तेव्हा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं हे नातं संपवल्याचं जाहीर केलं होतं. कुठेही तिनं रोहमनला दोष दिला नव्हता आणि तिचं ते वागणं तिच्या चाहत्यांना खूप भावलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen i never got married because men were a let down it had nothing to do with my kids dcp
First published on: 01-07-2022 at 19:07 IST