स्वप्नील जोशीचं चाहत्यांना सरप्राइज; प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय ‘भारताचा ओटीटी प्लॅटफॉर्म’

‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या आपल्या कंपनीच्या माध्यमातून तो हे ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहे.

swapnil-joshi-narendra-firodiya-ott
(Photo-Instagram@swapnil joshi)

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता स्वप्नील जोशी आता एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अगदी बाल वयापासूनच स्वप्नीलने मराठीसह हिंदी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. त्यानंतर आता स्वप्नीलने प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी दिलीय.

स्वपीन जोशी प्रेक्षकांसाठी स्वत:च ओटीटी प्लॅटफॉर्म घेवून येत आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी असणार आहे. हिंदी, मराठी, बंगाली आणि प्रादेशिक भाषांमधील सिनेमा, वेब सीरीज आणि मालिका या ओटीटीवर पाहायला मिळतील. ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या आपल्या कंपनीच्या माध्यमातून तो हे ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहे. स्वप्नील जोशी आणि नरेंद्र फिरोदिया गेल्या दीड वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मचा विचार करत होते.

हे देखील वाचा:‘बचपन का प्यार’ फेम सहदेवसोबत इंडियन आयडलच्या मंचावर धमाल, आदित्य नारायणने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

स्वप्नील जोशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिलीय. या पोस्टमध्ये तो म्हणाला, “मार्च २०२० सालात आलेल्या करोनाच्या महामारीमुळे सगळं ठप्प पडलं. आता पुढे काय असे विचार सतत डोक्यात येत होते. अखेर दीड वर्षांनंतर त्या कायचं उत्तर मिळालं. माझी कंपीन टमोरा डीजीवर्ल्ड लवकरच प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत असल्याचं सांगताना खूप आनंद होतोय. होय तुम्ही बरोबर वाचलतं. आम्ही लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहोत.” असं स्वपील म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

पुढे तो म्हणाला, “या रोमांचक प्रवासात नरेंद्र फिरोदिया सारखे पार्टनर माझ्यासोबत आहेत याचा मला आनंद आहे. लेटफ्लिक्ट नावाचं एक ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा त्यांचा मानस होता. आता लेटफ्लिक्स आणि टमोरा डिजीवर्ल्ड एकत्र आल्याचा मला आनंद आहे. आता आम्ही एकत्रीतपणे एक ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांसाठी लॉन्च करत आहोत याचा मला आनंद आहे.” असं स्वपनील त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

तेव्हा स्वप्नील जोशी त्याच्या या नव्या कोऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swapnil joshi announced his national ott with narendra firodiya kpw