जूनमध्ये प्रेक्षकाच्या भेटीला येतोय स्वप्नीलचा ‘मोगरा फुलला’

कौटुंबिक समस्यांमध्ये गुंतलेल्या एका मुलाभोवती ‘मोगरा फुलला’ची कथा फिरते.

अभिनेता स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ येत्या जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटांमध्ये स्वप्नील जोशी याच्याबरोबर साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख यांसारख्या कलाकारांची मांदीयाळी पाहायला मिळणार आहे.

https://www.instagram.com/p/Bu20z8NlUZ8/

प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर ह्या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे वळल्या आहेत. याआधी त्यांनी लपंडाव, सरकारनामा, लेकरू यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. कौटुंबिक समस्यांमध्ये गुंतलेल्या एका मुलाभोवती ‘मोगरा फुलला’ची कथा फिरते. या समस्यांमध्ये तो इतका गुंततो की आपलं लग्नाचं वय निघून गेलं आहे हे त्याच्या लक्षातही येत नाही. एके दिवशी तो अत्यंत खंबीर आणि स्वतंत्र विचाराच्या मुलीच्या प्रेमात पडतो. ती एका वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलगी आहे. त्याच्याही लक्षात जेव्हा प्रेमाची ही बाब येते तेव्हा ही प्रेमकथा खूप पुढे सरकलेली असते साधरण असं कथानक या चित्रपटाचं असणार आहे.

https://www.instagram.com/p/Bu5UNG8lp9n/

येत्या १४ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. स्वप्नीलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाची माहिती दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Swapnil joshi mogara fulala will release in june