मुंबई : मराठी रंगभूमीवरचे दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी प्रथमच एकत्र येत ‘लग्नपंचमी’ हे नवीन नाटक नवीन वर्षाच्या सुरुवातीला रंगभूमीवर घेऊन येत आहेत. या नाटकात प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी प्रमुख भूमिकेत असून एका तपाने तो रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे.

लवकरच तो नागराज मंजुळे यांच्या ‘माचो’ चित्रपटातही दिसणार आहे. त्याच्या या भूमिकेबद्दलही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

‘सर्व उत्तम सुरू असताना मला मराठी रसिक प्रेक्षक नेहमीच विचारायचे, ‘तू नाटकात कधी दिसणार?’ तू नाटक कर रे… ही त्यांची मागणी होती. मी १२ वर्षांपूर्वी ‘गेट वेल सून’ हे नाटक केलं होतं. आपल्याकडे रसिक नाटकाशी घट्ट जोडला गेला आहे. ती त्यांची सांस्कृतिक भूक आहे. त्यामुळे ‘लग्नपंचमी’ या नाटकातील भूमिका ही त्यांच्यासाठी आहे’, अशी भावना स्वप्निलने व्यक्त केली. अभिनेत्री अमृता खानविलकर या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे.

Award Banner