scorecardresearch

भन्साळी यांच्या पहिल्या मराठी चित्रपटात स्वप्निल जोशी नायक

न्साळी यांची निर्मिती असलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे ‘बाजीराव मस्तानी’नंतर आता मराठीत निर्माता म्हणून पदार्पण करीत आहेत. भन्साळी यांची निर्मिती असलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. ‘लाल इश्क गुपित आहे साक्षीला’ असे चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट येत्या २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. स्वप्ना वाघमारे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात स्वप्निल जोशी, अंजना सुखानी, जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे, कमलेश सावंत हे कलाकार आहेत. चित्रपटाचे लेखन शिरीष लाटकर यांनी केले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘भन्साळी प्रॉडक्शन’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘ब्लॅक’, ‘देवदास’, ‘गुजारिश’, ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’नंतर भन्साळी यांनी मराठीत निर्माता म्हणून पदार्पण केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swapnil joshi to play lead role in first sanjay leela bhansali marathi film