Video : डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून स्वरा भास्करने केला डान्स; म्हणाली, “हे मी माझ्या वडिलांकडून…”

स्वराने दारुचा ग्लास डोक्यावर ठेवून डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्त एखाद्या सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. यामुळे अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. पण एवढं असूनही स्वरा काही शांत बसत नाही. आता स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकंतच स्वराने दारुचा ग्लास डोक्यावर ठेवून डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर स्वरा भास्करला प्रचंड आनंद झाला आहे. याप्रकरणी आनंद व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ स्वराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओ स्वरा ही डान्स करताना दिसत आहे.

त्यावेळी तिच्या डोक्यावर दारुचा रिकामी ग्लास ठेवून एका पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे असा डान्स करण्यामाग एक खास कारण असल्याचे तिने सांगितले आहे. तसेच या व्हिडीओला तिने अनोखे कॅप्शन दिले आहे. “पार्टीसाठीची ही युक्ती मी माझ्या वडिलांकडून शिकली आहे,” असे ती म्हणाली. ‘तसेच १९ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता सेलिब्रेशन केलं पाहिजे,” असेही तिने सांगितले.

हेही वाचा – Farm Laws Live : “आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही”; पंतप्रधानांच्या घोषणेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारने तीनही नवीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली. सरकारने संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अनेक व्यासपीठांवरून त्याच्याशी बोललो, पण त्यांनी मान्य केले नाही. त्यामुळे आता हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायद्यांबद्दल माफी मागितली. सरकार एका वर्षाहून अधिक काळ ते शेतकऱ्यांना समजवण्यास अपयशी ठरले असे मोदींनी म्हटले आहे. “मी देशवासीयांची मनापासून आणि मनापासून माफी मागतो. आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. आमच्या प्रयत्नांमध्ये काहीतरी उणीव राहिली असावी जी आम्ही काही शेतकर्‍यांना पटवून देऊ शकलो नाही,” असे मोदी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swara bhaskar dance with a glass on her head celebrating withdrawal of all three agriculture laws video viral nrp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या