scorecardresearch

स्वरा भास्करला टॅक्सी ड्रायव्हरने लुटले, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला धक्कादायक अनुभव

स्वराने केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

swara bhaskar,
स्वराने केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. स्वरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्याच्या संपर्कात राहते. सध्या स्वरा ही लॉस एंजेलिसमध्ये आहे. तिला तिथे एक वाईट अनूभव आला आहे. याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने सांगितले आहे.

स्वरानं तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग ट्वीट करत सांगितला आहे. स्वराने ट्वीट करत Uber Cab कंपनीला तक्रार दाखल केली आहे. स्वरा म्हणाली, “उबर कंपनीनं कृपया माझी ही तक्रार नोंदवून घ्या. तुमचा एक ड्रायव्हर माझा सगळा सामान घेऊन फरार झाला आहे. तुमच्या अॅपवर तक्रार करण्यासाठी कुठलीच सोय नाही आहे. हे काही मी चुकून विसरले वगैरे नाही. तर तो चक्क माझा सामान घेऊन पळाला आहे.”

आणखी वाचा : सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं…

स्वराच्या या ट्वीटवर उबर कंपनीने उत्तर दिले आहे. या ट्वीटमध्ये ते म्हणाले, “तुमच्यासोबत जे घडलं यासाठी आम्ही दिलगीर व्यक्त करतो. पण निश्चितच आमच्या कंपनीच्या इतिहासात असं घडलेलं नाही. आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेत आहोत,आणि लवकरच आमच्याकडून ह्या तक्रारीची चौकशी होईल आणि तुम्हाला संपूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल.”

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असूनही घरजावई? विकी जैनने सांगितलं अंकिता लोखंडेच्या घरी राहण्याचे कारण

आणखी वाचा : The Kashmir Fliesचा मोठा विक्रम, ठरला करोना काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट; तब्बल इतक्या कोटींची कमाई

कुटुंबासोबत होळी साजरी केल्यानंतर स्वरा अमेरिकेला गेली आहे. तिनं आपल्या ट्रॅव्हल एक्सपीरियन्सचे अनेक फोटो शेअर केले आहेत. स्वराची ‘शीर कूर्मा’ शॉर्ट फिल्म लवकरच रीलीज होणार आहे. यात शबाना आझमी आणि दिव्या दत्ता आहेत. फराझ अरिफ अन्सारी यांनी या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. ही एक लव्ह स्टोरी आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swara bhaskar tweet uber driver ran away with her luggage dcp

ताज्या बातम्या