चार वर्षाच्या मुलाला स्वरा भास्करनं दिल्या शिव्या, कारण…

तेव्हा काय घडले होते?

स्वरा भास्कर बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आश्चर्याची बाब म्हणजे स्वरा अभिनयापेक्षा तिच्या खळबळजनक विधानांमुळेच जास्त चर्चेत असते. अलिकडेच तिने एका मुलाखतीत दरम्यान एका चार वर्षांच्या मुलाला शिव्या दिल्याची कबुली दिली. त्या मुलाने तिला आंटी अशी हाक मारली, म्हणून तिने त्याला शिव्या घातल्या होत्या.

‘सन ऑफ अबिश’ नावाच्या एका शोमध्ये स्वरा भास्करला गप्पा मारण्यासाठी बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात सूत्रसंचालकाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली? याबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने हा अवाक् करणारा किस्सा सांगितला.

तेव्हा काय घडले होते?

स्वराने एका जाहिरातीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. दाक्षिणात्य भाषेमध्ये ही साबणाची जाहिरात तयार झाली होती. या जाहिरातीमध्ये स्वरासोबत एक चार वर्षांचा मुलगा देखील होता. त्याने स्वराला बघून आंटी अशी हाक मारली. हा किस्सा सांगत असताना स्वराने म्हटले की “माझ्या करिअरला सुरूवातही झाली नव्हती आणि या ‘#$%’ (शिवी) मुलाने मला आंटी म्हणून हाक मारली. त्यावेळी मी पहिल्यांदाच कॅमेरासमोर अभिनय करत असल्यामुळे प्रचंड दबावात होते. त्याला लघुशंका करण्यासाठी जायचे होते. त्याने जाहिरातीच्या दिग्दर्शकाला याबाबत सांगितले. मात्र त्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. अखेर त्याने मला आंटी अशी हाक मारुन याबाबत माहिती दिली. त्याने आंटी म्हणताच मी त्याच्यावर चिडले आणि त्याला शिवी दिली. या घटनेमुळे जाहिरातीसाठी मी घेतलेली मेहनत पाण्यात गेली असेच मला वाटले.”

नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील विधानांमुळे प्रकाशझोतात आलेल्या स्वरा भास्करचा या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओवरून स्वरा भास्करला तिच्यावर टीका करणाऱ्यांनी ‘स्वरा आंटी’ म्हणून चिडवायला सुरुवात केली आहे. ट्विटरवर स्वरा आंटी नावाचा हॅश टॅग देखील ट्रेंड होऊ लागला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swara bhasker abuses 4 year old kid for calling her aunty mppg

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या