‘हा फोटो तुकडे तुकडे गॅंगच्या…’, स्वरा भास्करचे ट्विट व्हायरल

तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर अमेरिकन पॉप स्टार रिहानाने केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरला होता. अभिनेत्री कंगनासोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ट्विट करत रिहानावर टिका केली होती. त्यात आता अभिनेत्री स्वरा भास्करने देखील एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून स्वराने रिहानाला टोला लगावला आहे.

स्वराने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत स्वरा सेटवर असल्याचे दिसत आहे. फोटोत कॉफीमग असून त्यावर work-work-work लिहलेले आहे. “शुटींगचा दिवस, हा फोटो मी टुकडे टुकडे गॅंगची आंतरराष्ट्रीय सदस्य रिहाना ताईंना समर्पित करते” अशा आशयाचे कॅप्शन फोटो शेअर करत स्वराने दिले आहे. स्वराचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलनाकडे जगाचं लक्ष वेधणारी रिहाना नेमकी आहे तरी कोण?

फक्त अमेरिकन पॉपस्टार रिहानाने नाही तर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने आणि पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पण आता स्वरा भास्करने देखील रिहानाला सुनावले आहे. स्वरा भास्कर तिच्या अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. अनेक वेळा तर यामुळेच स्वरा ट्रोल होताना दिसते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Swara bhasker called rihanna international member of tukde tukde gang dcp 98 avb