तो जवळ येत म्हटला Love you baby; स्वरा भास्करने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वराने हा प्रसंग सांगितला.

Swara Bhasker
स्वरा भास्कर

बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी अभिनेत्री स्वरा भास्कर ओळखली जाते. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील हस्तमैथुनाच्या दृश्यावरून ती ट्रोल झाली. पण ट्रोलर्सना स्वराने आपल्याच खास शैलीत उत्तरदेखील दिलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वराने कास्टिंग काऊचचा तिला आलेला अनुभव सांगितला.

‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात स्वरा बऱ्याच विषयांवर मोकळेपणाने व्यक्त झाली. यावेळी बॉलिवूडमध्ये तिला कधी कास्टिंग काऊचचा अनुभव आला का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने हा प्रसंग सांगितला की, ‘मिटींगसाठी मी एका प्रसिद्ध निर्मात्याकडे गेली होती. तिथे त्याचा व्यवस्थापक सतत मला माझ्या घरचा पत्ता विचारत होता. तो व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी होता आणि तिथून बाहेर निघण्याचा मी विचार करत होती. अखेर जेव्हा बाहेर जाण्यासाठी निघाली तेव्हा त्याने मला किस करण्याचा प्रयत्न केला. माझ्या जवळ येत Love you baby असं म्हणाला. मी मागे वळून पाहिलं असता तो व्यक्ती अगदी माझ्या जवळच होता. हासुद्धा कास्टिंग काऊचचा एक भागच आहे.’

जेलमधल्या त्या दिवसांनी माझ्यातील अहंकार मोडला- संजय दत्त

‘मी टू’ #MeToo मोहिमेमुळे अनेकांनी कास्टिंग काऊचचे अनुभव सोशल मीडियावर सांगितले होते. हॉलिवूडसोबतच बॉलिवूडचाही एक काळा चेहरा जगासमोर आला होता. वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्वराने नेहमीच कणखरपणे तिची बाजू मांडल्याचं पाहायला मिळालं. तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा तिला ट्रोलदेखील करण्यात आलं. पण हे सगळं न जुमानता स्वरा तिचा स्पष्टवक्तेपणा जपताना दिसते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swara bhasker on casting couch this guy tried to kiss my ear and said i love you baby

ताज्या बातम्या