बॉलिवूडमध्ये आपले मत बिनधास्तपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेली स्वरा भास्कर बऱ्याच दिवसांपासून ट्रोलिंगची शिकार होताना दिसत आहे. स्वरा भास्कर देशातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर बोलताना दिसते. त्यामुळे कधी-कधी तिला सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागते. अर्थात या ट्रोलिंगमुळे स्वराला काहीच फरक पडत नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वराने ती ट्रोलिंगचा कसा सामना करते यावर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००९ मध्ये ‘माधोलाल कीप वॉकिंग’ मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या स्वराने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामधील तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने ‘तनु वेड्स मनू’, ‘रांझना’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘तुन वेड्स मनु रिटर्न्स’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जहां चार यार’ या चित्रपटात स्वरा भास्कर दिसली होती.

आणखी वाचा-“आई झाल्यानंतर मी चूक केली की…” सोहा अली खानचं वक्तव्य चर्चेत

‘कनेक्ट एफएम कॅनडा’ला दिलेल्या मुलाखतीत स्वराने सोशल मीडियावरून होणाऱ्या ट्रोलिंगची तुलना कौटुंबिक हिंसाचाराशी केली आहे. ती म्हणाली, “जर एखाद्या स्त्रीसह कौटुंबिक हिंसाचार होत असेल आणि तो हिंसाचार चालूच राहिला किंवा कोणत्याही कारणास्तव तिची स्थिती बदलू शकत नसेल, तर ती सामना करायला शिकते. तिला समजतं की आता मी हिट होणार आहे आणि ही एक अतिशय गुंतागुंतीची जागा आहे जिथे पीडिता हिंसेचा सामना करण्यास शिकते. त्यामुळे मला वाटते की माझ्यासोबतही असेच घडले आहे, मानसिकदृष्ट्या, ट्रोलिंग आणि शिवीगाळ करून आता मी या सर्व गोष्टींचा सामना करायला शिकले आहे.”

आणखी वाचा- “करण जोहर खूनी…” सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दलच्या प्रश्नावर स्वरा भास्कर स्पष्टच बोलली

स्वरा भास्कर पुढे म्हणाली, “बरेचदा विशिष्ट विचारसरणीचे लोक मला सोशल मीडियावर ट्रोल करत असतात. कधी कधी मी ट्वीट पाहते आणि मला असे वाटते की काहीतरी घडणार आहे आणि मला माहीत आहे की ते सुरू झाले आहे आणि २४ तासांचे चक्र आहे. त्यामुळे मलाही ‘ट्विटर कॉन्ट्रोव्हर्सी’ समजते. माझ्यावर जी टीका होती ती एखाद्या अजेंडावर आधारित असते. एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचे लोक मला ट्रोल करतात आणि ते असे का करतात, हे मलाही माहीत आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhasker reaction on trolling against her statement goes viral mrj
First published on: 26-09-2022 at 14:06 IST