लवकरच होणार आई; स्वराने स्वत: केला खुलासा

स्वरा नेहमीच ट्रोल होताना दिसते, मात्र यावेळी तिचे कौतुक केले जात आहे.

swara bhasker, swara bhasker going adopt a child,
स्वरा नेहमीच ट्रोल होताना दिसते, मात्र यावेळी तिचे कौतुक केले जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. स्वरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा या सगळ्यामुळे स्वराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नेहमीच मला कुटुंब पाहिजे होतं अशा तिच्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तिला ट्रोल न करता तिची स्तुती केली जात आहे.

मला नेहमीच फॅमिली हवी होती,मुलं हवी होती. आणि आता ती वेळ आली आहे. मी लवकरच आई होणार आहे,माझी फॅमिली असेल, असे वक्तव्य स्वराने केले होते. बऱ्याच काळापासून स्वरा अनाथ मुलांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो या मोहिमेसाठी काम करत आहे.

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

त्यामुळे स्वरा आई होण्याची बातमी खरी असली तरी ती एका दत्तक घेतलेल्या मुलाची आई होणार आहे. तिने त्यासाठी रीतसर रजिस्ट्रेशन केलं असून दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. “मी भाग्यवान आहे की मी भारतात राहते. कारण आपल्या देशात अविवाहीत स्त्रीला मुल दत्तक दिले जाते. कारण काही देशात मुल दत्तक घेण्यासाठी लग्न करावे लागते. दत्तक घेण्यापूर्वी खूप अभ्यास केला असं स्वरा म्हणाली.

आणखी वाचा : प्रियांका होणार आई? निकसोबत चाहत्यांनाही बसला धक्का

पुढे स्वरा म्हणाली, अनेक अनाथालयांना भेट दिली आहे. अनेक दत्तक घेतलेल्या मुलांच्या पालकांना भेटली आहे. दत्तक मुलांचीही भेट घेतली आहे. मला त्या प्रत्येकाचा अनुभव जाणून घ्यायचा होता म्हणजे माझा पुढचा प्रवासही सोपा होण्यास मदत होईस. दत्तक प्रकियेचा कालावधी खूप मोठा असतो. यामुळेच मला आई होण्यासाठी खूप वाट पाहावी लागते, या गोष्टीसाठी आता तीन वर्षे उलटली आहेत. पण या संपूर्ण प्रवासात मला माझ्या आई-वडीलांची साथ लाभली हे महत्त्वाच आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swara bhasker to adopt a child and going to be mother all the process is started dcp