Udaipur Murder Case : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली. या हत्येचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून हल्लेखोरांनी शिवणकाम व्यावसायिकाच्या दुकानात घुसून त्याच्यावर चाकू आणि तलवारीने वार केले आहेत. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यासोबत चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : “हे सगळं देवाच्या नावावर…”, उदयपूर हत्या प्रकरणावर कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
mira bhaindar chicken shops marathi news
नागरिकांना अंधारात ठेवल्याची महापालिकेची कबुली, रविवारच्या मांसाहार बंदीमुळे मिरा भाईंदरमध्ये संताप
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

या घटनेवर प्रतिक्रिया देत अभिनेत्री स्वरा भास्करने कारवाई करण्याची मागणी करत आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे सांगितले. “निंदनीय… गुन्हेगारांवर कायद्यानुसार तात्काळ आणि कडक कारवाई झाली पाहिजे! निर्घृण हत्या.. अन्यायकारक! नेहमी म्हटल्याप्रमाणे.. देवाच्या नावाने मारायचे असेल तर सुरुवात स्वतःपासून करा! राक्षस, अशी पोस्ट शेअर करत स्वराने संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

पाहा पोस्ट

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

याशिवाय विशाल दादलानी हे सगळं हद्दपार झालं आहे. हे वेडेपणाचे, भ्रष्ट आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे. दोषींवर कायद्याने कारवाई होऊन त्यांना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. कृपया हे लक्षात ठेवा की सर्व जातीय द्वेष आणि हिंसा अस्वीकार्य आहे. हे खूप वाईट गोष्ट आहे की राजकारणातील धर्मामुळे भारताला दररोज त्रास होत आहे.

आणखी वाचा : पापाराझींना कसं कळतं की सेलिब्रिटी कधी आणि कुठे असणार आहेत? मजेशीर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने दिले उत्तर

पाहा पोस्ट

आणखी वाचा : “मी एक स्त्री आहे पार्सल नाही…”, प्रेग्नेंसी न्यूजवर संतापली आलिया भट्ट

विशाल दादलानी शिवाय रिचा चड्ढाने देखील पोस्ट शेअर करत कन्हैयालालच्या कुटुंबाचे दु: ख समजुन घेण्यास सांगितले आहे. “हा व्हिडिओ कोणत्याही चेतावणीशिवाय मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. कृपया हे शेअर करू नका पीडितच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या मनाला झालेल्या आघाताचा विचार करा! या हत्येचे कोणतेही समर्थन नाही. कट्टरपंथी मुस्लिम गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा द्या.

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर

पाहा पोस्ट

आणखी वाचा : राज ठाकरेंबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’मधील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात

काय आहे हे पूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैयालालने सोशल मीडियावर नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली होती. आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, ही पोस्ट कन्हैयाच्या ८ वर्षांच्या मुलाने केली होती. या घटनेनंतर कन्हैयालालवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. १० जून रोजी शेअर केलेल्या या पोस्टबद्दल कन्हैयालालवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर १५ जून रोजी त्यांची जामिनावर सुटकाही झाली होती.

पाहा व्हिडीओ

यानंतर १७ जून रोजी कन्हैयालालने स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगून पोलिसांत तक्रार दाखल केली. आपल्याला शिरच्छेद करण्याची धमकी दिली जात असल्याचे कन्हैयालालने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी विरोधी पक्ष आणि कन्हैयालाल यांना एकत्र बोलावून त्यांची समजूत काढली आणि प्रकरण शांत केले. मात्र, कन्हैयालालच्या निर्घृण हत्येनंतर प्रशासनावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.