स्वराज्याच्या इतिहासातले एक सोनेरी पर्व उलगडणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. स्वराज्य राखून ते वृद्धिंगत करण्याचा महाराणी ताराराणी यांचा प्रवास प्रेक्षकांना भारावून टाकणारा आहे. ‘रायगडावर भाऊबंदकी माजून स्वराज्य संपेल’ ही औरंगजेबाची अटकळ फोल ठरवत त्यांनी राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं. पण आता या मालिकेत लवकरच एक नवं वळण येणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले…’ या मालिकेतून लोकप्रियता मिळालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगजेबाच्या सततच्या षड्यंत्रांमुळे स्वराज्याच्या छत्रपतींचे रक्षण महत्त्वाचे, ही भूमिका घेऊन ताराराणींनी राजाराम राजेंना जिंजीस जाऊन राहायचा सल्ला दिला. खूप विचार विनिमयानंतर ते यासाठी तयार झाले. जिंजी हा स्वराज्यातला दक्षिणेकडचा अजिंक्य असा किल्ला होता, पण तिथे पोचण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास करून जावं लागणार होतं. या प्रवासात जिवाचा धोका होता आणि औरंगजेबाचं सैन्य सतत राजाराम राजेंच्या मागावर होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaraj saudamini tararani serial apurva nemalekar update avb
First published on: 22-01-2022 at 17:19 IST