मिका सिंगच्या स्वयंवरमध्ये मराठमोळ्या विनोदी कलाकाराची मुलगी होणार सहभागी

‘स्वयंवर मिका दी वोटी’ या कार्यक्रमात एका मराठमोळ्या अभिनेत्याची मुलगी देखील सहभागी होणार आहे.

mika di vohti dhwani pawar

सुप्रसिद्ध गायक मिका सिंगच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याने आजवर अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. त्याची गाणी अगदी थिरकायला लावणारी असतात. आपल्या कामामुळे मिका हा सतत चर्चेत असतो. त्याशिवाय मिकाचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असते. लवकरच मिका सिंग हा विवाहबंधनात अडकणार आहे. स्टार भारत या वाहिनीवर ‘स्वयंवर मिका दी वोटी’ नव्या रिअॅलिटी शो सुरु झाला आहे. या स्वयंवरमध्ये १२ जणी सहभागी होणार आहेत. ‘स्वयंवर मिका दी वोटी’ या कार्यक्रमात एका मराठमोळ्या अभिनेत्याची मुलगी देखील सहभागी होणार आहे. त्यामुळे त्याच्या स्वंयवरची जोरदार चर्चा रंगली आहे.

मिका सिंगच्या स्वयंवरसाठी तब्बल १२ जणी सहभागी घेतला आहे. त्यात एका मराठी विनोदी कलाकाराच्या मुलीनेही सहभाग घेतला आहे. ध्वनी पवार असे या स्पर्धकाचे नाव आहे. ती ‘स्वयंवर मिका दी वोटी’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. ध्वनी पवार ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. ध्वनीने काही शोचे सूत्रसंचालन केले आहे. तिला गाण्याची देखील उत्तम जाण आहे. ध्वनीने अनेक अॅनिमेशन शोसाठी तिने व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचे काम केले आहे. ‘बळी’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ध्वनीने ‘चला हवा येऊ द्या’ मंचावरही उपस्थित दर्शवली होती.

“आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आतापर्यंत हिंदी सिनेसृष्टीत अनेक मराठी कलाकारांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ध्वनी ही हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार विजय पवार यांची मुलगी आहे. विजय पवार हे हिंदी कॉमेडी शोमधून व्हीआयपी या नावाने लोकप्रिय झाले आहेत. त्यांनी ‘कॉमेडी सर्कस’, ‘देख इंडिया देख’, ‘कॉमेडी नाईट्स’, ‘कॉमेडी क्लासेस’, ‘बाकरवडी’, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली ड्रामा’ अशा वेगवेगळ्या शोमधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यात त्यांच्या विनोदाने त्याने हास्याची धमाल उडवून दिली होती.

विजय पवार यांना ‘बोल बच्चन’ या बॉलिवूड चित्रपटात त्याला अभिनयाची संधी मिळाली होती. ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘हम सब उल्लू है’ अशा चित्रपटातून तो विनोदी भूमिकेत पाहायला मिळाला. व्हीआयपी म्हणून ओळख मिळवलेला विजय हे जवळपास १५० कलाकारांची मिमिक्री करण्यात पटाईत आहे. विजयच्या पावलावर पाऊल टाकत त्याची मुलगी ध्वनीने देखील आता हिंदीसृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे.

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर नीतू कपूर यांचे वक्तव्य, म्हणाल्या “कोणीही कोणालाही…”

महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून कार्यक्रमासाठी ध्वनीला एक सेलिब्रिटी म्हणून आमंत्रित करण्यात येते. ‘स्वयंवर मिका दि वोटी’ या शोमुळे ध्वनी प्रकाशझोतात आली आहे. या शोमध्ये ध्वनीसोबत सोनल तीलवानी, प्रांतिका दास, चंद्राणी दास, बुशरा शेख, आश्लेषा रावले अशा १२ जणींनी सहभाग घेतला आहे. या १२ जणींमधून मिका सिंग कोणाची निवड करणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात मराठी मुलगी म्हणून ध्वनी पवार बाजी मारणार का? याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swayamvar mika di vohti famous comedian daughter dhwani pawar has also participated in swayamvar nrp

Next Story
टायगर श्रॉफने केला अफलातून गोल; नेटकऱ्यांनी केली Ronaldo-Messi सोबत तुलना; पाहा Viral Video
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी