scorecardresearch

Premium

‘माझ्या आयुष्यात कंगनाला महत्व नाही’, तापसीने दिलं कंगनाला सडेतोड उत्तर

एका मुलाखतीत तापसीने हे वक्तव्य केलं आहे.

taapsee pannu hits back on kangana ranaut
ट्विटरवर कंगनावर असलेल्या बंदीवर तापसीने वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि कंगना रनौत यांच्यात नेहमीच वाद सुरु असतात. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल अनेकदा तापसीवर निशाना साधताना दिसतात. तर, तापसी नेहमी जागीच त्यांना उत्तर देताना दिसते. आता पुन्हा एकदा तापसीने त्यांना उत्तर दिले आहे. तापसीला ट्विटरवर कंगनाची आठवण येत नाही, तिच्यासाठी कंगना महत्वाची नाही, असं तिने म्हटलं आहे.

तापसीने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला नुकतीत मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ट्विटरवर कंगनावर असलेल्या बंदीवर तापसीने वक्तव्य केलं आहे. “नाही, मला तिची आठवण येत नाही आणि तिला पुन्हा एकदा तिथे पाहण्याची माझी इच्छा नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात तिचं काही महत्व नाही. ती एक कलाकार आणि आदरणीय सहकारी आहे पण त्यापेक्षा माझ्या आयुष्यात तिचं जास्त महत्व नाही. मला तिच्याबद्दल चांगली किंवा वाईट भावना नाही,” असे तापसी म्हणाली.

आणखी वाचा : ‘दोन मुलांची आई असल्याने मला काम मिळतं नाही..’, अभिनेत्रीने केला खुलासा

तापसी पुढे म्हणाली, “जर तुम्हाला कोणी आवडतं नाही तर ते आपल्या मनापासून येतं. परंतु यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला त्याचा फरक पडतं नाही कारण आपण त्यांना तेवढे महत्व किंवा त्यांच्या विषयी विचार करत नाही. जे आहे ते आहे मला काही फरक पडत नाही.”

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

गेल्या आठवड्यात कंगनाची बहीण रंगोली चंदेलने सोशल मीडियावर तापसीवर निशाना साधला होता. तापसीने तिच्या रशियाच्या सहलीत साडी परिधान केली होती. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यावर रंगोली म्हणाली की ‘तापसी पुन्हा एकदा कंगनाला कॉपी करते.’ तापसी कंगनाची ‘क्रीपी फॅन’ असल्याचे रंगोली म्हणाली. या आधी तिने तापसीला कंगनाची ‘सस्ती कॉपी’ असल्याचे म्हटले होते. हे सगळं पाहता तापसीने हे वक्तव्य केल्याचे म्हटले जातं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

दरम्यान, तापसी लवकरच ‘हसीन दिलरुबा’, ‘रश्मि रॉकेट’, ‘शाबाश मिठु’, ‘लूप लपेटा’, ‘दोबार’ आणि ‘वो लडकी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे कंगना ‘थलाइवी’, ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taapsee pannu hits back on kangana ranaut and says she is too irrelevant for her dcp

First published on: 30-06-2021 at 10:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×