‘मला शेवटच्या मिनिटाला चित्रपटातून काढून टाकलं होतं’, तापसी पन्नूचा गौप्यस्फोट

चित्रपटातून बाहेर काढल्यानंतर निर्मात्यांनी तिची माफी देखील मागितली होती.

taapsee pannu, taapsee, tapsee upcoming project,
तापसीने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी तापसी पन्नू हिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. चौकटी बाहेरच्या भूमिका साकारत तापसीने हळहळू जम बसवला. मात्र हा प्रवास तिच्यासाठी कठीण होता. एकदा तर तिला शेवटच्या मिनिटाला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तापसीने स्वत: याबाबत खुलासा केला आहे.

नुकताच तापसीने आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही गोष्टींचा खुलासा केला. एकदा तर तिला मीडियाच्या माध्यमातून चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे कळाले होते. पण तापसीने त्या चित्रपटाचे किंवा निर्मात्यांचे नाव सांगितलेले नाही. शेवटच्या मिनिटाला चित्रपटातून बाहेर काढल्यानंतर निर्मात्यांनी तिची माफी देखील मागितली होती.

आणखी वाचा : ‘तुझ्या दिसण्यामुळं तुझं अभिनेत्री होणं कठीण’, नीना गुप्तांनी मुलीला दिला होता सल्ला

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

या मुलाखतीमध्ये तापसीला ‘तू एखादा चित्रपट साइन केलास आणि नंतर तुला त्या चित्रपटातून काढून टाकले असे कधी झाले आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत तापसी म्हणाली, ‘हो माझ्यासोबत असे झाले आहे. मी फक्त सेटवर गेले नव्हते. मी चित्रपटासाठी तारखा दिल्या होत्या. पण नंतर मला कळाले की मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.’

पुढे तापसी म्हणाली की, ‘निर्मात्यांचे माझ्याशी बोलणे देखील झाले नाही. त्यांनी अचानक हा निर्णय घेतला. मीडियाच्या माध्यमातून मला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे कळाले होते. नंतर निर्मात्यांनी फोन करुन माझी माफी मागितली. पण त्यांनी मला चित्रपटातून का काढले या मागचे खरे कारण सांगितले नाही.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taapsee pannu says makers apologised to her for dropping from film avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या