तापसीनं घडवली अद्दल; स्पर्श करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचं मोडलं बोट

नेमकं काय झालं तापसीसोबत?

तापसी पन्नू

सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना बेधडक उत्तर देण्यासाठी अभिनेत्री तापसी पन्नूने छेड काढणाऱ्याला चांगलीच अद्दल घडवल्याचं समोर आलं आहे. एका टॉक शोमध्ये बोलत असताना तापसीने तिच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. त्यामुळे चित्रपटांमध्ये बऱ्याच वेळा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या मुलीची भूमिका साकारणारी तापसी खऱ्या आयुष्यातही तशीच असल्याचं दिसून येत आहे.

“गुरूपर्व सुरु झाल्यावर गुरुद्वारामध्ये अनेक भक्त येत असतात. त्यामुळे तेथे प्रचंड गर्दी होते. आम्हीदेखील या काळात गुरुद्वाराला गेलो होतो. या ठिकाणी बाहेरच्या बाजूला असलेल्या एका स्टॉलवर सर्वांना जेवण दिलं जात होतं. त्यामुळे तिथे बरीच गर्दी होती. त्यामुळे या गर्दीत आपल्यासोबत काही तरी चुकीचं घडेल अशी पुसटशी कल्पनाही येत होती. मात्र मी मोठ्या धीराने या गर्दीत प्रवेश केला आणि मनात जी भीती होती तसंच झालं. कोणीतरी मला चुकूच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला”, असं तापसी म्हणाली.

पुढे तिने सांगितलं. “मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श झाल्याचं लक्षात आल्यानंतर मी त्या माणसाला तसंच सोडून दिलं नाही. त्याला चांगला धडा शिकवला. मी त्या विकृत माणसाचं बोटं मोडलं आणि तशीच तेथून निघून गेले”.

वाचा : ग्रेट! अक्षय कुमार करतोय ‘मिशन मंगल’च्या दिग्दर्शकाच्या उपचारांचा खर्च

दरम्यान, तापसी पन्नूने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. ‘पिंक’, ‘नाम शबाना’ या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केल्यानंतर तिने तिचा मोर्चा आगामी चित्रपटाकडे वळवला आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू मिथाली राजच्या बायोपिकमध्ये तापसी झळकणार असून लवकरच तिचा ‘थप्पड’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taapsee pannu says one man tries to harass her and she revert him ssj