scorecardresearch

“यासाठी १० वर्षं लागली पण…” तापसी पन्नूनं शाहरुख खानबाबत केलेलं ट्वीट चर्चेत

तापसी पन्नूचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

taapsee pannu, shahrukh khan, taapsee pannu tweet, Dunki, rajkumar hirani, rajkumar hirani film, तापसी पन्नू, शाहरुख खान, राजकुमार हिरानी, डंकी, तापसी पन्नू ट्वीट
प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूचं शाहरुख खानबाबतचं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी लवकरच एका चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचं टायटल ‘Dunki’ सध्या सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे. एकीकडे शाहरुखच्या या नव्या चित्रपटाच्या घोषणेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूचं शाहरुख खानबाबतचं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

तापसी पन्नूनं तिच्या अधिकृत ट्विटर हॅन्डवरून एक ट्वीट केलं आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. तापसी पन्नून या ट्वीटमध्ये आपला आनंद व्यक्त केला आहे. राजकुमार हिरानी यांच्या या चित्रपटात तापसी पन्नू शाहरुख खानसोबत काम करणार आहे आणि याच आनंदात तापसीनं ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये तिनं शाहरुखच्याच चित्रपटातील एक डायलॉगही शेअर केला आहे.

आणखी वाचा- अभिषेकच्या आधी ऐश्वर्यानं केलं होतं आणखी एक लग्न, कारण होतं फारच विचित्र

आपल्या ट्वीटमध्ये तापसीनं लिहिलं, ‘हो इथेपर्यंत पोहोचणं कठीण आहे. जेव्हा तुम्ही एकटेच स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा हे कठीण असतं. पण एका सुपरस्टारनं म्हटलंय, ‘अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है’ प्रामाणिकपणा, कठोर मेहनत आणि आत्मियता यामुळे हे शक्य झालं. जवळपास १० वर्ष लागली यासाठी पण आता सर्व काही ठिक आहे.’

आणखी वाचा- प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचं निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान याआधी तापसीनं अधिकृत घोषणा करतानाही एक ट्वीट केलं होतं. तिने लिहिलं, ‘अखेर हे होत आहे. माझ्या आगामी चित्रपटाची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे.’ या ट्वीटमध्ये तापसीनं राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान यांना टॅग केलं होतं. यासोबतच हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार असल्याचंही तिनं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taapsee pannu tweet for shahrukh khan and rajkumar hirani goes viral mrj

ताज्या बातम्या