जेठालालमुळे स्पॅनिश पत्रकाराला झाला फायदा, ‘तो’ फोटो शेअर करताच…

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पत्रकाराने केला खुलासा…

Levon Aronian, taarak mehta ka ooltah chashma, jethalal, spanish chess journalist david llada,
सोशल मीडियावर फोटो शेअर करत पत्रकाराने केला खुलासा…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका फक्त आपल्या देशात नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. त्यात जेठालाल ही भूमिका तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

एका स्पॅनिश पत्रकाराने जेठालालचा एक फोटो शेअर केल्यानंतर त्याचे चक्क २०० फॉलोवर्स वाढले आहेत. याची माहिती स्वत: पत्रकार David Llada ने दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत सांगितले फक्त एकदा जेठालाल विषयी बोललो आणि २०० फॉलोवर्स वाढले.

खरतरं २१ नोव्हेंबर रोजी आर्मेनियाच्या बुद्धिबळ खेळाडू Levon Aronian ने जेठालालचा आणि त्याचा प्रिंटेड शर्टमधला फोटो कोलाज करून शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तो म्हणाला, “लोक मला विचारतात की जेव्हा मी खेळतो तेव्हा माझी गर्लफ्रेंड काय करते? माझ्या फोटोंचे मीम्स बनवते आणि काय..?”

आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?

आणखी वाचा : प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

Levon Aronian ची ही पोस्ट स्पॅनिश पत्रकार आणि बुद्धिबळ प्रमोटर David Lladaने त्यांच्या ट्वीट अकाऊंटवरून शेअर केली आहे. एवढचं काय तर त्यांनी हा फोटो शेअर करत कॅप्शन दिले की “जेठालाल चांगला दिसतो.” फक्त एकदा जेठालाल विषयी ट्वीट केल्यानंतर त्यांचे २०० फॉलोवर्स वाढले आहेत. यावरून विचार करा की जेठालालची लोकप्रियता किती आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashma show jethalal made spanish chess journalist david llada got 200 new followers on twitter know details dcp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!