Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Gurucharan Singh Hint Video Viral : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी ऐकून चाहते खूप आनंदी होतील. या मालिकेत एक कलाकारा पुन्हा परतणार आहे, त्याने स्वतः याबद्दल संकेत दिले आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील आपण ज्या पात्राबद्दल बोलत आहोत ते दुसरे तिसरे कोणी नसून रोशन सोढीची भूमिका करणारा अभिनेता गुरुचरण सिंह आहे. सोढीची भूमिका नेहमीच लक्षात ठेवणारा गुरुचरण बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर आहे. एका वर्षापूर्वी गुरुचरण बेपत्ता झाल्याची बातमी आली होती. सुमारे तीन आठवड्यांनंतर गुरुचरण स्वतःहून घरी परतला. शोमधील त्याचे चाहते अजूनही त्याची खूप आठवण काढतात. आता गुरुचरणने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
गुरुचरणची पोस्ट
गुरुचरणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “आज मी खूप दिवसांनी तुम्हा सर्वांसमोर आलो आहे. बाबाजींनी माझ्या कुटुंबाच्या आणि तुमच्या सर्व चाहत्यांच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्याकडे खूप चांगली बातमी आहे, जी मी लवकरच तुमच्या सर्वांबरोबर शेअर करेन. माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि मी ते कधीही विसरणार नाही.”
गुरचरण सिंहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक त्यावर सतत कमेंट करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने त्यावर कमेंट करत लिहिले की, ‘जर तुम्ही तारक मेहता शोमध्ये परत आलात, तर यापेक्षा मोठी चांगली बातमी नसेल.’ दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले की, ‘याचा अर्थ तुम्ही शोमध्ये परत येत आहात.’ एकाने लिहिले की, ‘चांगल्या बातमीचा अर्थ तुम्ही तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये येत आहात, पाजी?
१७ वर्षांनंतरही आजही ही मालिका टीआरपीमध्ये इतर मालिकांना मागे टाकत बऱ्याचदा अव्वल स्थानी असल्याचे पाहायला मिळते.
