‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडले आहेत. मालिका सोडलेल्या काही कलाकारांनी असित कुमार मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री सातत्याने मालिकेच्या निर्मांत्यांवर आरोप करीत आहे. त्यानंतर मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदौरियाने असित मोदींच्या विरोधात भाष्य केले होते आणि आता ‘तारक मेहता…’ मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजा हिने देखी निर्मात्यांबद्दल मोठे खुलासे केले आहे.

हेही वाचा : “नाकाची सर्जरी करून…” करिअरच्या सुरुवातीला अदा शर्माला मिळालेला ‘तो’ सल्ला; अभिनेत्री अनुभव सांगताना म्हणाली…

प्रिया अहुजाने अलीकडेच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ‘तारक मेहता…’चे पूर्वीचे दिग्दर्शक मालव राजदा यांच्याशी लग्न झाल्यानंतर कशी परिस्थिती बदलली याबाबत अनेक खुलासे केले आहेत. ती म्हणाली, “मालवशी लग्न झाल्यानंतर सेटवरची सगळी परिस्थिती बदलली आणि गरोदर राहिल्यावर यात आणखी बदल झाला. मूल झाल्यावर मी मालिकेत परत येण्याबद्दल विचारले, परंतु मला समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. एके दिवशी मी असित मोदींना मेसेज केला की मला तुमच्याशी बोलायचे आहे, त्यानंतर त्यांनी फोन केला. मी त्यांना सांगितले की, रिटाच्या भूमिकेबद्दल बोलायचे आहे, यावर ते म्हणाले, आपण नंतर बोलू… एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला तेव्हा मी खूप रडले. एवढी वर्ष काम करून मला जराही आदर नाही का? मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर न देता फोन त्यांनी फोन ठेवला.”

हेही वाचा : “नमस्ते दर्शको…” कोणी केली सारा अली खानची हुबेहूब नक्कल?; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून अभिनेत्री म्हणाली…

मालव राजदा यांनी सुद्धा ही मालिका काही दिवसांपूर्वीच सोडली आहे. त्यांनी सांगितले की, एकदा इंडियन आयडॉलमध्ये संपूर्ण टीम गेली असतानाही प्रियाला या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले नव्हते. तिला साहजिक याचे खूप वाईट वाटायचे. असित मोदींना मी कधीही प्रियाला एखाद्या सीनमध्ये घ्या असे सांगितले नाही, तरीही अनेकदा शोमध्ये रिटाची भूमिका जिथे आवश्यक होती तिथेही तिला कास्ट करण्यात आले नव्हते.

हेही वाचा : ‘चुकीला माफी नाही’ नाट्यगृहात मोबाईल वापरणाऱ्या प्रेक्षकांना अमृता सुभाषने स्पष्टच सांगितले; म्हणाली, “कित्येकदा नाटक मध्येच…”

जेनिफरने मालिकेत १४ वर्ष काम केले यादरम्यान मी तिला कोणाशीही गैरवर्तन करताना पाहिले नाही. ती वेळेवर यायची आणि तिचे कामे करायची. परंतु तिने केलेल्या इतर आरोपांबाबत कोणतीही माहिती नसल्याचे मालव राजदा यांनी सांगितले.

Story img Loader