‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेली १४ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतूनच अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमुळे ‘दयाबेन’ची भूमिका साकारणारी दिशा वकानी व ‘तारक मेहता’च्या भूमिकेत दिसणारे शैलेश लोढा घराघरात पोहोचले होते. वैयक्तिक कारणामुळे या दोघांनीही मालिका सोडली. त्यानंतर आता या मालिकेच्या दिग्दर्शकांनीही तारक मेहता का उलटा चष्माला रामराम ठोकला आहे.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

हेही वाचा>>Video: चित्रा वाघ “थोबडवून काढेन” म्हणाल्यानंतर उर्फी जावेदने पुन्हा शेअर केला चित्र-विचित्र कपड्यांमधील व्हिडीओ, म्हणाली…

मालव राजदा गेली १४ वर्ष ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे प्रेक्षकही नाखुश आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मालव राजदा यांनी १५ डिसेंबरला त्यांचा मालिकेतील शेवटचा भाग दिग्दर्शित केला. निर्माते व मालव राजदा यांच्यात खटके उडाल्याने त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा>> “मी तयार नव्हते…”, लग्नानंतर महिन्याभरातच पाठकबाईंचा खुलासा

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मालव राजदा म्हणाले, “१४ वर्ष ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेचं मी दिग्दर्शन केलं. त्यामुळे मी कंम्फर्ट झोनमध्ये गेलो होतो. या मालिकेने मला खूप काही दिलं आहे. प्रसिद्धी, पैसा याबरोबरच माझी धर्मपत्नीही मला याच मालिकेमुळे मिळाली. निर्मात्यांबरोबर वाद झाल्याने मी मालिका सोडली”.