scorecardresearch

‘पतीमुळेच हिचे करिअर उद्धवस्त झाले’, तारक मेहतामधील दयाबेनच्या पतीवर संतापले नेटकरी

सध्या सोशल मीडियावर दयाबेनचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिच्या पतीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

‘पतीमुळेच हिचे करिअर उद्धवस्त झाले’, तारक मेहतामधील दयाबेनच्या पतीवर संतापले नेटकरी
सध्या सोशल मीडियावर दयाबेनचा फोटो व्हायरल झाला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तसेच मालिकेतील दयाबेन आणि जेठालालची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडते. पण दयाबेन ही भूमिका साकारणारी दिशा वकाशी गेले काही दिवस मालिकेत दिसत नाहीये. दरम्यान, सोशल मीडियावर दयाबेनचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरुन चाहत्यांनी दिशाच्या पतीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

२०१७ मध्ये दिशा मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. तेव्हापासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. सध्या ती काय करते? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशातच दिशाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये ती मुलीसोबत दिसत आहे. तिचा हा फोटो नो मेकअप लूकमधील आहे. तिचा हा फोटो पाहून तिचे वजनही काहीसे वाढलेले दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावर थकवाही पाहायला मिळत आहे. या लूकमध्ये तिला ओळखणं ही फार कठीण झालं आहे.
आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या कलाकारांनी दिवाळीत खरेदी केल्या नव्या गाड्या

एका यूजरने दिशाच्या या फोटोवर कमेंट करत तिला सुनावले आहे. ‘दिशाच्या पतीने तिचे करिअर उद्धवस्त केले आहे. हे फार वाईट आहे’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने तुम्ही मालिकेत पुन्हा कधी दिसणार असा प्रश्न विचारला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत अभिनेत्री दिशा वकानीने दयाबेन ही भूमिका साकारली आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून दिशा मालिकेत दिसत नाही. त्यामुळे दयाबेनला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. ती पुन्हा कधी मालिकेत दिसणार असे अनेकदा निर्मात्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जाते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2021 at 15:54 IST

संबंधित बातम्या