मुनमुन दत्ताने सांगितला लैंगिक शोषणाचा भयानक अनुभव, म्हणाली ‘ शाळेतील शिक्षक आणि चुलत भाऊ…’

मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा भयानक अनुभव सांगितला होता.

taarak mehta ka ooltah chashmah, munmun dutta, babita ji,
मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा भयानक अनुभव सांगितला होता.

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची लोकप्रियता काही कमी नाही. मालिकेतील बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता विषयी काही दिवसांपूर्वी टप्पू म्हणजेच राज अनाडकटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, मुनमुनने एकदा तिचे लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा केला होता.

मुनमुनने २०१७ मध्ये हा खुलासा केला होता. तिचे काका, शिक्षक आणि चुलत भावाने तिचे लैंगिक शोषण केले होते. याविषयी सांगताना मुनमुनने एक नोट लिहिली होती, “असे काही लिहिताना त्या गोष्टींना आठवण केल्यामुळे डोळ्यातून अश्रू येतात, जेव्हा माझ्या बाजुला राहणारे काका आणि त्यांच्या नजरेची मला भीती वाटायची. जे संधी मिळाली की मला पकडायचे आणि मला धमकवायचे की कोणालाही काहीही सांगू नकोस. माझ्यापेक्षा वयाने मोठा असलेला माझा चुलत भाऊ किंवा ज्याने मला हॉस्पिटलमध्ये जन्म झाल्यानंतर पाहिले आणि १३ वर्षांनी माझ्या शरीराला स्पर्श करणे योग्य आहे असे त्याला वाटले, कारण मी लहान होते आणि माझ्या शरीरात बदल होत होते. माझे शिक्षक ज्याचा हात माझ्या अंडरपॅंटमध्ये होता. आणखी एक शिक्षक जो वर्गात असलेल्या मुलीच्या ब्राचा स्ट्रॅप खेचत ओरडायचा किंवा मग रेल्वे स्टेशनवरील तो व्यक्ती ज्याने तुम्हाला पकडले होते,” असे मुनमुन म्हणाली.

आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल

आणखी वाचा : रकुल प्रीत सिंगने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली

पुढे मुनमुन म्हणाली, “का? कारण तुम्ही खूप लहान आहात आणि बोलायला घाबरत आहात. एवढी भीती वाटते की तुम्हाला पोटात गोळा येतो आणि गुदमरल्यासारखे वाटते. तुम्हाला हे माहित नाही की तुम्ही तुमच्या पालकांना हे सगळं कसं समजावून सांगाल किंवा तुम्हाला कोणालाही एक शब्दही सांगण्याची लाज वाटते. मग तुम्हाला पुरुषांविषयी खूप राग येतो, कारण तुम्हाला माहित आहे की तुमची जी परिस्थिती आहे त्याचे गुन्हेगार ते आहेत. त्या घाणेरड्या भावना त्या जाण्यासाठी वर्षे लागतात. मला आनंद आहे की या चळवळीत माझा आवज सामील झाला आहे आणि लोकांना याची जाणीव करून देते की त्यांनी मला ही सोडले नाही. पण, आज कोणीतरी माझ्याशी असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल, तर मी त्याला सोडणार नाही. मी कोण आहे याचा मला अभिमान आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah fame munmun dutta aka babita ji told the world about her sexual abuse dcp

Next Story
बसस्टॉप आणि ती सुंदर मुलगी; बीग बींच्या कॉलेज जीवनातील खास किस्सा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी