“माझ्याकडे कोणतेही काम नव्हते अन् त्यादरम्यान…”, मालिकेबद्दल ‘जेठालाल’ यांचा धक्कादायक खुलासा

जेठालाल हे पात्र साकारणारे अभिनेता दिलीप जोशी हे घराघरात प्रसिद्ध आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका फक्त आपल्या देशात नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. त्यात जेठालाल ही भूमिका तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. जेठालाल हे पात्र साकारणारे अभिनेता दिलीप जोशी हे घराघरात प्रसिद्ध आहेत. पण ही मालिका सुरु होण्यापूर्वी जेठालाल यांनी करिअरला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.

दिलीप जोशी यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरु होत असताना जेठालाल हे पात्र ऑफर करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी दिलीप जोशी हे सिनेसृष्टीला रामराम करणार होते. विशेष म्हणजे या मालिकेची ऑफर मिळण्यापूर्वी वर्षभर ते बेरोजगार होते.

अनेक मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी ज्या मालिकांमध्ये काम करत होते, त्या सर्व मालिका बंद झाल्या होत्या. त्यामुळे जवळपास वर्षभर दिलीप जोशींकडे कोणतेही काम नव्हते. त्याचदरम्यान ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित कुमार मोदी यांनी दिलीप जोशी यांच्याशी संपर्क साधला.

हेही वाचा : “ही माझी खुर्ची आहे”, परीचा नेहाला दम; धमाल व्हिडीओ पाहिलात का?

त्यावेळी असित कुमार मोदी यांनी दिलीप जोशींना एका कॉमेडी मालिकेसाठी विचारणा केली. यावेळी त्यांनी ‘चंपकलाल’ आणि ‘जेठालाल’ यापैकी एकाची निवड करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यावेळी दिलीप यांनी ‘चंपकलाल’ ऐवजी ‘जेठालाल’ हे पात्र निवडले. पण असित कुमार मोदी यांच्यामते, दिलीपने ‘चंपकलाल’ची व्यक्तिरेखा साकारावी अशी इच्छा होती, अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : कंगना रणौतचा पुन्हा प्रेमभंग? सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, “तेरे लिए…”

मात्र दिलीप जोशी यांनी ते कशाप्रकारे जेठालालच्या पात्रासाठी अधिक योग्य आहेत? याचा विश्वास असित कुमार मोदीला दिला. त्यानंतर जे काही घडले ते प्रेक्षकांच्या समोर आहे. ज्या दिलीप जोशी यांना एकेकाळी सिनेसृष्टीला कायमचे रामराम करायचे होते, तेच आता टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते म्हणून ओळखले जातात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah jethalal fame dilip joshi wanted to quit acting know the reason nrp

ताज्या बातम्या