छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात प्रसिद्ध ठरली. या मालिकेत तारक मेहताची पत्नी अंजली भाभी ही कायमच चर्चेत असते. या मालिकेत अंजली भाभी हे पात्र अभिनेत्री नेहा मेहताने साकारले होते. मात्र काही वर्षांपूर्वी नेहाने ही मालिका सोडली. दरम्यान मालिका सोडल्यानंतर तब्बल २ वर्षांनी नेहाने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंजली भाभीची भूमिका साकारणाऱ्या नेहाने २०२० मध्ये मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. तिने तब्बल १२ वर्षे या मालिकेत काम केले. नेहाच्या मालिका सोडण्याच्या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला. यानंतर आता तब्बल २ वर्षांनी नेहाने मालिकेबद्दल गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, “मी २०२० मध्ये मालिका सोडली होती. हा शो माझ्या कुटुंबाचा एक भाग बनला होता. त्यामुळे मी काहीही न बोलता तो शो सोडणे योग्य समजले. पण २ वर्षे उलटून गेल्यानंतर अद्याप मला माझे थकीत मानधन मिळालेले नाही. मी निर्मात्यांना कॉल करुन थकली आहे. पण कोणतेही उत्तर मिळालेले नाही.”

“आपण लढलात म्हणून आम्ही घडलो…”, शिंदेशाही घराण्याचे नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट

त्यावर शो चे निर्माते म्हणाले, “नेहा ही या शो चा एक भाग आहे. इतकी वर्षे तिने मालिकेत काम केले आहे. पण तिने काहीही न सांगता ही मालिका सोडली. त्यावेळी तिला मेलही करण्यात आला होता. मात्र तिने काहीही उत्तर दिले नाही. तिने कोणत्याही कागदपत्राशिवाय स्वाक्षरी केलेली नाही. आम्ही तिच्याशी नेहमी बोलण्याचा प्रयत्न केला. पण कोणत्याही नियमाशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे तिने निर्मात्यांवर खोटे आरोप करण्यापूर्वी ईमेलला उत्तर दिले असते तर बरे झाले असते.”

मिका सिंगच्या स्वयंवरमध्ये मराठमोळ्या विनोदी कलाकाराची मुलगी होणार सहभागी

दरम्यान नेहाने २००४ साली ‘रात होने को हैं’ आणि ‘देस में निकला होगा चांद’ या मालिकेत काम केले. यापूर्वी २००१ साली नेहाने गुजराती आणि २००३ साली धाम या तेलगु चित्रपटात काम केले आहे. सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah makers called neha mehta allegation false says she is not responding our communication since past two years nrp
First published on: 25-06-2022 at 10:49 IST