scorecardresearch

टप्पूसोबत बाल विवाह करणारी टिना, पाहा आता कशी दिसते

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपलं मनोरंजन करत आहे.

taarak mehta ka ooltah chashmah, tappu, tina,
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपलं मनोरंजन करत आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील कोणती जोडी प्रेक्षकांना आवडते तर ती टप्पू आणि सोनूची आहे. पण तुम्हाला आठवत असेल तर टप्पू लहान असताना त्याच लग्न एका मुलीशी झालं होतं. या मुलीच नाव टिना असे होते. ती टिना आता काय करते हे आज आपण जाणून घेऊया.

मालिकेतील एका एपिसोडमध्ये दादाजी टप्पूच लग्न टिना नावाच्या मुलीशी ठरवतात. टप्पूच लग्न ठरलं हे ऐकल्यानंतर जेठालालला धक्काच बसतो. त्यावेळी टिनाचा अभिनय हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. टिनाची भूमिका साकारणाऱ्या या मुलीचे खरे नाव नुपुर भट्ट आहे. नुपुरचा जन्म ११ नोव्हेंबर १९९९ साली झाला असून ती आता २१ वर्षांची आहे.

आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीने भर स्टेजवर रोहित शेट्टीला मारली लाथ, Video Viral

नुपुर सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नुपुरचे सोशल मीडियावर मीम्सचे एक पेज आहे. यावर ती अनेक मीम्स शेअर करताना दिसते. नुपुरचे इन्स्टाग्रामवर ८ हजार पेक्षा जास्त फॉलोव्हर्स आहेत. नुपुर ‘तारक मेहता…’च्या ज्या एपिसोडमध्ये दिसली होती. तो एपिसोड २००८ साली प्रदर्शित झाला होता. खरतरं, नुपुर ‘तारक मेहता…’च्या दोन एपिसोडमध्येच दिसली होती. त्यावेळी नुपूर ही फक्त ८ वर्षांची होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah tappus wife tina now look like this dcp

ताज्या बातम्या