‘तारे जमीन पर’मधील छोटा दर्शील आता दिसतो फार हँडसम, फोटो पाहिलात का?

त्याचा हा लूक फार हटके दिसत आहे.

फोटो क्रेडीट – दर्शील सफारी/ इन्स्टाग्राम

बॉलिवूडमधील अतिशय हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘तारे जमीं पर.’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता आमिर खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात इशान अवस्थीची भूमिका साकारणाऱ्या दर्शीलने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचीही दाद मिळवली होती. त्यानंतर बऱ्याच काळासाठी हा दर्शील सफारी रुपेरी पडद्यापासून दूर आहे. तारे जमीं पर हा चित्रपट प्रदर्शित होऊन १४ वर्षे उलटली आहे. त्यामुळे त्यात बालकलाकाराची भूमिका साकारणारा दर्शील हा फार मोठा झाला आहे. नुकतंच दर्शीलचा एक फोटो समोर आला आहे. यात तो फारच सुंदर आणि पहिल्यापेक्षा हँडसम दिसत आहे.

दर्शील सफारी हा आता २४ वर्षांचा झाला आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सिनेसृष्टीपासून दूर असलेला दर्शील हा अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच त्याने त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात तो पांढऱ्या रंगाच्या टीशर्टमध्ये दिसत आहे. त्यासोबत त्याने काळ्या रंगाचा चश्मा परिधान केला आहे. त्याचा हा लूक फार हटके दिसत आहे.

तर दुसऱ्या एका फोटोत दर्शीलने काळ्या रंगाचे हुडी परिधान केले आहे. कॉपी मी, असे कॅप्शन त्याने त्याच्या या फोटोला दिले आहे. इतकंच नव्हे तर दर्शीलच्या इन्स्टाग्रामवर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहे. यात त्याने त्याच्या मित्र-मैत्रिणींसोबत फोटो पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे त्याचे हे फोटो पाहून त्याला ओळखणे ही कठीण झाले आहे.

विशेष म्हणजे त्याच्या या नव्या लूकवर नेटकऱ्यांनी हटके प्रतिक्रिया दिली आहे. तू आताही तितकाच गोड दिसतोस, जेवढा त्यावेळी होतास, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर काहींनी दर्शीलची तुलना थेट हॉलिवूड स्टार आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोन्ससोबत केली आहे.

‘तारे जमीन पर’ या चित्रपटात दर्शील सफारी एक बालकलाकार म्हणून दिसला. या चित्रपटात दर्शिल सफारीने आमिर खानसोबत काम केले होते. त्यानंतर तो खूप लोकप्रिय झाला. त्याची ही भूमिका बच्चेकंपनीसह तमाम रसिकांना भावली होती. आमिर खानसारखा सुप्रसिद्ध चेहरा असतानाही बालकलाकाराच्या भूमिकेतील दर्शील सफारी प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.

दर्शीलला या चित्रपटासाठी फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देण्यात आला. ‘तारे जमीं पर’ नंतर दर्शीलनं ‘बमबम बोले’, ‘जोकोमोन’, ‘मिडनाइट्स चिल्ड्रेन’ या चित्रपटांमध्ये काम केलं. दर्शीलनं अनेक टीव्ही शो मध्येही काम केलं आहे. ‘सुन यार ट्राय मार’ आणि कलर्स टिव्हीचा डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा’ या टीव्ही शोमध्ये दिसला. तसेच तो काही जाहिरातींमध्येही झळकला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taare zameen par darsheel safary transformation into a charming young man see photos nrp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या