‘जब तक है जान…’, रहमान यांनी सांगितल्या आठवण

आज चित्रपट प्रदर्शित होऊन आठ वर्षे पूर्ण झाली आहे.

यश चोप्रा यांच्या काळातील रोमान्सपट ‘जब तक है जान’ आणि त्याला ए. आर. रहमान यांनी चढविलेला स्वरसाज प्रत्येक भारतीयांना मंत्रमुग्ध करून गेला. शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का मुख्य भूमीकेत असलेला हा सिनेमा यश चोप्रांचा शेवटचा सिनेमा ठरला. हा चित्रपट १३ नोव्हेंबर २०१२ साली प्रदर्शित झाल होता. भारतीय सिनेमांच्या इतिहासात स्वत:च्या महान कारकीर्दीचा आलेख रचता-रचता अचानक हा अष्टपैलू हिरा काळाच्या पडद्याआड गेला. व्हायआरएफच्या ‘जब तक है जान’करीता पहिल्यांदाच यश चोप्रा आणि ऑस्कर विजेता ए. आर. रहमान यांची गट्टी जमून आली होती.

सदाबहार यश चोप्रा यांच्यासमवेत काम करतानाच्या आठवणी ताज्या करताना रहमान म्हणाले, “या अशा दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. त्यांच्याकडे (यश चोप्रा) सगळ्या गोष्टींसाठी लहानग्या मुलासारखा उत्साह असायचा. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला या स्वभावाची भुरळच पडायची. व्हायआरएफ स्टुडिओज अँड मूव्हीज मागे त्यांची दूरदृष्टी आपण सर्वच जाणतो. मात्र त्यांचे काम किती नियोजित पद्धतीने असायचे हे पाहणे रोचक होते. हा अनुभव छान होता. या अशा हरहुन्नरी व्यक्तींकडून तुमच्याही काही अपेक्षा असतात, मात्र ते कायमच नवीन कल्पना निवडीला प्राधान्य देत; त्यांच्याकडे नाविन्यपूर्ण निवड करण्याची अतिरिक्त गुणवत्ता होती. जी परंपरेला धरून असे.”

या सिनेमाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त यश चोप्रांसोबतची सर्जनशील प्रक्रिया रहमान उलगडून सांगतो. ते म्हणतो, “माझ्या मते त्यांनी त्यांच्या सर्वच सिनेमांचा मागोवा घेतला. सर्व यशराज फिल्म्स आणि मी त्याहून अधिक काय देऊ शकतो याचा विचार केला. मी त्या झोनमध्ये गेलो आणि तो सिनेमा नक्कीच रोचक झाला. सिनेमाचा विषय माझ्या आवडत्या विषयांपैकी होता आणि त्यामुळे, मी प्रवाहासोबत गेलो.”

रहमान पुढे सांगतात, “या सिनेमाच्या संगीताची निर्मिती मुंबईत झाली, माझ्या स्टुडिओत आणि त्यांच्या स्टुडियोत, त्यावेळी आम्ही शटलिंग करत असायचो. मला ठाऊक होते, ते (यश चोप्रा) कधीही अन्य स्टुडिओत जात नाहीत, मात्र ते मायेने माझ्या स्टुडिओत आले आणि गुलजार साहेब सोबत होते; (तेव्हा) आम्ही तिघे होतो. ही सांगीतिक निर्मिती अतिशय अविस्मरणीय ठरली.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tabtak hai jaan a r rehman yash chopra avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या