बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी आणि निर्माती ताहिरा कश्यप ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. एक आई म्हणून ताहिराला किती संघर्ष करावा लागला असे ताहिराने सांगितले आहे. एकदा ताहिरा तिच्या मुलाला एका रेस्टॉरंटमध्ये विसरली होती. हा खुलासा ताहिराने ‘द 7 सिन्स ऑफ बींग ए मदर’ या पुस्तकाच्या लॉन्चच्या वेळी केला आहे.

ताहिराची २ मुलं आहेत. एकाचे नाव विराजवीर आहे. विराजवीरचा जन्म हा २०१२ साली झाला आहे. तिला एक मुलगी आहे. तिचे नाव वरुष्का आहे. वरुष्काचा जन्म २०१४ साली झाला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ताहिरा विराजवीरला रेस्टॉरंटमध्ये विसरल्याचे तिने सांगितले आहे.

Boy Confesses Love For Okra Vegetable Priyanka Chopra Reacts on video
‘भेंडीची चव म्हणाल तर…’ चिमुकल्याचे ‘भाजी’प्रेम पाहून प्रियांका चोप्राने शेअर केला ‘तो’ VIDEO; म्हणाली, ‘सेम…’
Hardik Ananya Ambani Wedding Video
VIDEO : हार्दिक-अनन्याच्या डान्सवरून रियान पराग का होतोय ट्रोल? युजर्स म्हणाले, ‘असं काय आहे त्याच्यामध्ये…’
woman crushed her lover with a stone
पिंपरी- चिंचवड: मित्राच्या मदतीने प्रेयसीने प्रियकराला दगडाने ठेचले; व्हिडीओ व्हायरल
a banner holding young guy suggest to friends always be aware from people who instigate people
“चांगली मैत्री लोकांना बघवत नाही..” तरुणाने दिला मित्रांना मोलाचा सल्ला, पाहा VIDEO
book information nexus by author yuval noah harari
बुकमार्क : हरारीच्या पुस्तकात नवं काय?
a young guy merged toilet with a scooter jugaad video goes viral
तरुणाने स्कुटीला लावला चक्क कमोड, जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल; VIDEO होतोय व्हायरल
a young man paints a sketch of a beautiful Vithuraya on the forehead of a pair of bullocks in Dnyaneshwar Maharaj Palkhi sohla
ज्ञानोबांच्या पालखीतील मानाच्या बैलजोडीच्या कपाळावर तरुणाने रेखाटले विठूरायाचे सुंदर चित्र, VIDEO होतोय व्हायरल
25% of new hires are married women; nearly 70% of workforce are women: Foxconn
ॲपलमध्ये महिलांना नोकरी नाकारली? कंपनीच्या स्पष्टीकरणात वेगळीच माहिती समोर, वाचा संपूर्ण प्रकरण

आणखी वाचा : शाहरुखनंतर गौरी खान आर्थर रोड तुरुंगात, मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी रवाना

ताहिराने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. विराजवीरच्या जन्मानंतर ही घटना झाल्याचे ताहिराने सांगितले आहे. “मी माझ्या मुलाला एका रेस्टॉरंटमध्ये विसरले होते. मी माझ्या मुलाला विसरली. तेव्हा एक वेटर धावत आला आणि म्हणाला मॅडम तुम्ही तुमच्या मुलाला विसरलात. मला खूप लाज वाटली आणि लोक माझ्याकडे बघत होते.” ताहिरा म्हणाली की त्यावेळी विराजवीर हा काही महिन्यांचा होता.

आणखी वाचा : “एक आई आपल्या मुलाला…”, मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे अर्जुन झाला ट्रोल

ताहिराने तिच्या पुस्तकात हा किस्सा देखील सांगितला आहे. , “दुपारी मी माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींसोबत जेवायला बाहेर गेली होती. त्यानंतर मी त्यांना मिठी मारली आणि लिफ्टच्या दिशेने आम्ही लिफ्टच्या दिशेने निघालो. तेवढ्यात स्टाफमधला एक सदस्य माझ्यादिशेने धावत आला आणि लिफ्टबंद होऊनये म्हणून त्याने दारात पाय ठेवला. ‘मॅडम, तुम्ही तुमच्या मुलाला विसरलात!’ लिफ्टमधले असलेल्या सगळ्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला, ते मी कधीच विसरू शकणार नाही. लोक बिल भरणे विसरतात किंवा बॅग विसरतात. मी माझ्या बाळाला विसरले, तरीही मी माझी बॅग धरली होती. किती निर्दयी आई आहे? “