टॅाकीज नाईट्सचा पुणेरी तडका

‘झी टॅाकीज’ वाहिनीने नऊ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत दहाव्या वर्षात पदार्पण केले.

‘मुक्काम पोस्ट पुणे’ हा धमाल मनोरंजक कार्यक्रम गुरुवारी २६ जानेवारीला सायंकाळी ६.०० वाजता ‘झी टॅाकीज’ व ‘झी टॅाकीज एचडी’ वर पाहता येईल.

‘झी टॅाकीज’ वाहिनीने नऊ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत दहाव्या वर्षात पदार्पण केले. या यशस्वी प्रवासाचे यश कलाकारांसोबत साजरे करत प्रेक्षकांना ‘टॅाकीज नाईट्स – मुक्काम पोस्ट पुणे’ सारख्या आगळ्या कार्यक्रमाची मेजवानी ‘झी टॅाकीज’ने दिली. पुण्यात ‘टॅाकीज नाईट्स’ अंतर्गत सादर झालेल्या रंगारंग कार्यक्रमास पुणेकरांनी चांगलीच दाद दिली. ‘टॅाकीज नाईट्स’च्या पुणेरी मुक्कामाचा आस्वाद गुरुवारी २६ जानेवारीला ‘झी टॅाकीज’ व ‘झी टॅाकीज एचडी’ वर सायंकाळी ६.०० वाजता घेता येईल.

‘टॅाकीज नाईट्स – मुक्काम पोस्ट पुणे’ या कार्यक्रमात अभिनेता पुष्कर क्षोत्रीचं खुसखुशीत निवेदन, सिद्धांत व ऋतुजा यांनी सादर केलीली ‘गणेशवंदना’, अभिनेता सुरेश विश्वकर्मा व सिद्धेश्वर झाडबुके यांनी सादर केलेलं ‘बापट वाडा’ हे धमाल प्रहसन, नृत्याच्या माध्यमातून अभिनेत्री शर्वरी जमेनीस हिने भारतमातेला दिलेली मानवंदना पहाता येणार आहे. शशिकांत केरकर, नम्रता आवटे, समीर चौघुले, विशाखा सुभेदार यांनी सादर केलेल्या धमाल नाट्यकृतींसोबत वैभव तत्ववादी, मानसी नाईक व शर्वरी जमेनीस यांचे नृत्याविष्कार प्रेक्षकांचे फुल ऑन मनोरंजन करणार आहे. अभिनय क्षेत्रातल्या दमदार कामगिरीबद्दल अभिनेता जितेंद्र जोशी यांना ‘पुणे रत्न’ पुरस्काराने या प्रसंगी सन्मानित करण्यात आले.

कलाविष्कारांचा नजराणा पेश करत रंगलेला हा सोहळा ‘झी टॅाकीज’च्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. निखळ मनोरंजनाचा ध्यास घेत, ‘आपलं टॅाकीज झी टॅाकीज’ टॅाकीज नाईट्स या कार्यक्रमाद्वारे, मनोरंजनाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘मुक्काम पोस्ट पुणे’ हा धमाल मनोरंजक कार्यक्रम गुरुवारी २६ जानेवारीला सायंकाळी ६.०० वाजता  ‘झी टॅाकीज’ व ‘झी टॅाकीज एचडी’ वर पाहता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Talkies nights mukkam post pune on zee talkies channel

ताज्या बातम्या