‘तमन्ना’ वेब सीरिजमधून समोर येणार एका जिद्दी तरुणीची कहाणी

समाजात यशाची उंची गाठणाऱ्या अनेक स्त्रियांसाठी ही सीरिज प्रेरणादायी ठरेल.

वेबसिरीजचे प्रस्थ मागच्या काही काळात वगाने वाढले आहे. वेगवेगळे विषय आणि पाहण्यासाठी कमी खर्चात उपलब्ध होत असल्याने प्रेक्षकांची त्याला पसंती मिळत आहे. दिवसागणिक या वेबसिरीजच्या यादीत भर पडत आहे. नुकतीच अशीच एक काहीशी हटके वेबसिरीज आपल्या भेटीला येणार आहे. या सिरीजचे नाव ‘तमन्ना’ आहे. “एका जिद्दी मुलीबद्दल आणि तिच्या आयुष्याबद्दल ही सीरिज भाष्य करते.” तमन्नाला तिची परिस्थिती तिच्या व्यवसायात सशक्त बनवू शकते ? तिची सकारात्मक वृत्ती आणि प्रचंड आत्मविश्वासामुळे तिला आयुष्याची उज्ज्वल बाजू पाहण्यासाठी अंधाऱ्या अवस्थेतून ती बाहेर येईल ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला ही सीरिज पाहूनच मिळतील. समाजात यशाची उंची गाठणाऱ्या अनेक स्त्रियांसाठी ही सीरिज प्रेरणादायी ठरेल.

मोदक मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि दीपिका श्रीवास्तव निर्मित आणि लकी शेख दिग्दर्शित ‘तमन्ना’ ही वेब सीरिज चित्रीत करण्यात आली आहे. या सिरीजचे शुटींग पुण्यात झाले असून ऑक्टोबर २०१८च्या अखेरीस ती प्रदर्शित करण्यात येईल. या सिरीजमध्ये अभिमन्यू काक आणि अनन्या डे हे मुख्य भूमिकेत आहेत. अभिमन्यू याने याआधी रेडिओवर आरजे म्हणून काम केले आहे. अनन्या डे ही एक बंगाली अभिनेत्री असून तिने कमी कालावधीत स्वत:चे नाव निर्माण केले आहे.

मोदक मोशन यांच्यावतीने ‘तमन्ना’ सीरिज मधून देवांशला लॉन्च केले जात आहे. मोदक मोशन पिक्चर्स या सिरीजमधून तो मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत असून आगामी काळात त्याचे सायलेन्स, सेल्फ कॉन्डेमेशन असे असून आगामी काळात मोदक मोशन कडून दर्जेदार कलाकृतींची निर्मिती केली जाणार आहे असे मोदक मोशन पिक्चर्सकडून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tamanna web serise will relise soon related to womens