Aranmanai 4 Box office Collection : बॉक्स ऑफिसवर तमन्ना भाटियाचा तमिळ चित्रपट धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले आहेत, पण या सिनेमाची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘अरणमनई ४’ असं या चित्रपटाचं नाव आहे. १७ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत यावर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व तमिळ चित्रपटांना मागे टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तमन्ना भाटियाचा चित्रपट ‘अरणमनई ४’ रिलीज होऊन १७ दिवस झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने ‘कॅप्टन मिलर’ आणि ‘अयलान’ सारख्या सिनेमांना मागे टाकलं आहे. हे दोन्ही या वर्षी प्रदर्शित झालेले सर्वाधिक कमाई करणारे तमिळ चित्रपट आहेत.

“ते गडकिल्ले तुमच्या बापाचे नाहीत”, गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी; म्हणाले, “तुम्ही असले चाळे…”

दोन आठवड्यात चित्रपटाने किती कमाई केली?

या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.६५ कोटींची कमाई केली होती. पहिल्या आठवड्यात एकूण कमाई ३२.१ कोटी रुपये होती. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात १७.१५ कोटींची कमाई केली होती. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ५३.६७ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफस कलेक्शन या चित्रपटाने केले आहे.

Video: “तू नाचलीस ना बास झालं…”, गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, “जरातरी लाजावं की…”

धनुषच्या कॅप्टन ‘मिलर’ला टाकलं मागे

तमन्ना भाटियाच्या या चित्रपटाने वर्षी रिलीज झालेल्या धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’ला मागे टाकलं आहे. इतकंच नाही तर ‘अयलान’ चित्रपटापेक्षाही ‘अरणमनई ४’ ने जास्त कमाई केली आहे. ‘कॅप्टन मिलर’ने ४९.२२ कोटी रुपये कमावले होते, तर ‘अयलान’ची भारतातील कमाई ४९.८१ कोटी रुपये होतं. या दोन तमिळ चित्रपटांना मागे टाकून ‘अरणमनई ४’ आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ऐश्वर्या राय बच्चनचे Cannes मधील २२ वे वर्ष; हाताला प्लास्टर अन् लेक आराध्याची साथ, पाहा खास Photos

‘अरणमनई ४’ प्रदर्शित होऊन झाले तीन आठवडे

हा चित्रपट ३ मे २०२४ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन १७ दिवस झाले आहेत. तीन आठवडे उलटूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया, राशी खन्ना यांच्यासह संतोष प्रताप, रामचंद्र राजू, जयप्रकाश, केएस रविकुमार, योगी बाबू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा एक विनोदी भयपट आहे. या चित्रपटाच्या आधीच्या तीन भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुंदरने केलं आहे. या चित्रपटाच्या निर्मितासाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamannaah bhatia film aranmanai 4 box office collection hrc