अभिनेत्री तमन्ना भाटीयाच्या आई-वडिलांची करोना चाचणी पॉझिटीव्ह

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

दिवसेंदिवस देशात करोना व्हायरसचा फैलाव वाढत चालला असल्याचे दिसत आहे. सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे दिसत आहे. अनेक मालिकांच्या सेटवर कलाकार आणि क्रू मेंबर्सची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटीयाच्या आई-वडिलांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटीयाने ट्विट करत तिच्या आई-वडिलांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे. तिने पोस्टमध्ये तिच्या आई-वडिलांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागल्यामुळे करोना चाचणी केली आणि ती पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे.

‘माझ्या आई-वडिलांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. म्हणून आम्ही सर्वांनी तातडीने करोना चाचणी केली आणि आज रिपोर्ट आले. त्यात माझ्या आई-वडिलांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. माझी आणि घरातील इतर लोकांची चाचणी निगेटीव्ह आली. आम्ही सध्या योग्य ती काळजी घेत आहोत’ असे तमन्नाने ट्विट केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tamannaah bhatia parents tested covid 19 positive avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या