scorecardresearch

५००० किलो मिटरच्या बाईक प्रवासावर गेला अभिनेता, फोटो व्हायरल

यापूर्वी त्याचे भारतातील बाईक ट्रिपचे फोटो व्हायरल झाले होते.

५००० किलो मिटरच्या बाईक प्रवासावर गेला अभिनेता, फोटो व्हायरल
अभिनेत्याचे हे फोटो सध्या चर्चेत आहेत.

कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. चाहते आपल्या आवडत्या कलाकारा विषयी जाणून घेण्यासाठी फार उत्सुक असतात. सध्या तमिळ सुपरस्टार अजित चर्चेत आहे. या चर्चा त्याने ५००० किलो मिटरचा प्रवास बाईकने करणार असल्याचे सांगितल्याने सुरु झाल्या आहेत.

अजित गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट ‘वालिमाई’चे रशियामध्ये चित्रीकरण करत होता. हा एक अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करुन अजित ५००० किलो मिटरच्या बाईक ट्रिपसाठी गेला आहे. त्यासाठी तो रशियातून बाहेर प्रवास करणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या अजितचे रशियातील बाईक ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तो तेथील अनेक शहरे फिरताना दिसत आहे. अजितला बाईकवर नवीन ठिकाणी फिरायला प्रचंड आवडत आहे. यापूर्वी त्याने सिक्कीम बाईक ट्रिप केली होती. या ट्रिपचे त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता तो रशिया आणि रशियाच्या जवळपासचा भाग बाईकवर फिरणार आहे.

अजित लवकरच ‘वालिमाई’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याने या चित्रपटाचे रशियातील चित्रीकरण पूर्ण केले आहे. हा एक अॅक्शन चित्रपट आहे. ‘वालिमाई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन एच विनोद करत आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक ११ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या