दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत होते. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच तो ऑनलाइन लीक झाला आहे. तमिळरॉकर्सने हा चित्रपट लीक केल्याचं सांगण्यात येत आहे.

तामिळरॉकर्ससोबत पायरसी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट लीक झाल्याचे वृत्त फिल्मीबीटने दिले आहे. RRR या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत होते. आरआरआर हा चित्रपट हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळमसह विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होताच त्याला पायरसीचा फटका बसलेला हा पहिला चित्रपट ठरला नाही. याआधी प्रभास आणि पूजा हेगडे यांचा राधे श्याम देखील प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच तामिळरॉकर्सवर लीक झाला. केवळ चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले चित्रपटच नाही तर दीपिका पदुकोणच्या गहराइयां हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून त्यांनी लीक केला.

A case has been registered against the scribes in the city police station for embezzlement of examination fees by the scribes of Miraj High School
लेखनिकाने केला अपहार, ३५८ विद्यार्थी मात्र निकालापासून वंचित
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

आणखी वाचा : “The Kashmir Files चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करा”, म्हणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अनुपम खेर यांचे सडेतोड उत्तर; म्हणाले…

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व

विश्लेषक रमेश बाला यांनी न्युज १८ शी बोलताना सांगितले, RRR ने जगभरात बॉक्स ऑफिसवर २५० कोटी रुपयांची कमाई करण्याचा अंदाज वर्तवला आहे. पहिल्याच दिवशी १०० ते ११० कोटी रुपये एकट्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून येतील असे त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा : Braची जाहिरात केली म्हणून अभिनेत्रीला पाकिस्तानी चाहत्यांनी केले ट्रोल, म्हणाले “तुला लाज वाटली पाहिजे”

या चित्रपटात एनटीआर ज्युनिअर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट सारखे मोठे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे. ‘आरआरआर’ चित्रपटाचे बजेट सुमारे ४५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.