scorecardresearch

तान्हाजींच्या वंशजांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

या मुलाखतीतून तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांनी लोकांना दिला मोलाचा संदेश

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करतोय. नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटात अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटामुळे तान्हाजी मालुसरे यांचे वंशज प्रकाशझोतात आले आहेत. तान्हाजींचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचत असल्याची भावना व्यक्त करतानाच त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांचे संवर्धन झालेच पाहिजे, असं शीतल मालुसरे म्हणाल्या. तान्हाजींच्या वंशजांनी याबाबत नेमकं काय म्हटलं ते या व्हिडीओत पाहा…

तान्हाजी मालुसरेंचे बारावे वंशज शिवराज मालुसरे यांच्या पत्नी शीतल मालुसरेंनी ‘तान्हाजी’ या नावापासून चित्रपटात सावित्रीबाईंचा लूक कसा असावा याबाबतचे बरेच सल्ले ओम राऊत यांना दिले. शीतल मालुसरे यांनी तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासावर पीएचडी केली आहे. त्यामुळे इतिहासातील बरेचसे संदर्भ जाणून घेण्यासाठी ओम राऊत शीतल यांच्याशी संपर्क साधायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनेक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शीतल मालुसरे व्याख्यानंसुद्धा देतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tanhaji malusare descendants request to maharashtra govt ssv