‘तान्हाजी’मुळे अजयचा भाव वधारला; ठरला लोकप्रिय अभिनेता

‘तान्हाजी’ हा अजयच्या करिअरमधील १०० वा चित्रपट आहे

ajay devgn
अजय देवगण

१० जानेवारी रोजी बॉक्स ऑफिसवर धडकलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट अजूनपर्यंत तिकीटबारीवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २२८.९६ कोटी रुपयांची कमाई केली असून अवघ्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले. विशेष म्हणजे चित्रपटाप्रमाणेच चित्रपटातील कलाकारसुद्धा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. इतकंच नाही तर तान्हाजीमुळे अजयच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

‘तान्हाजी’ हा अजयच्या करिअरमधील १०० वा चित्रपट असून या चित्रपटाने एक प्रकारचा इतिहास रचला आहे. हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर विजयाची मोहोर उमटवत असताना दुसरीकडे मात्र अजय लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर पोहोचला आहे. अजयने लोकप्रियतेमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे.

वाचा : ‘तान्हाजी’ : काजोलच्या जाऊबाईंच्या भूमिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

‘तान्हाजी’ चित्रपटाचं प्रमोशन सुरु असताना अजय लोकप्रियतेमध्ये चौथ्या स्थानी होता. मात्र तान्हाजी प्रदर्शित झाल्यानंतर अजयच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली. याचाच परिणाम त्याने प्रथम स्थान पटकावलं.
वाचा : बॅचलर पार्टीसाठी जगातली ‘ही’ २६ ठिकाणं आहेत बेस्ट

वाचा : सिताफळ खाल्ल्यामुळे स्त्रियांना होऊ शकतो ‘हा’ फायदा

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार, डिजिटल न्यूज (सोशल प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट), व्हायरल न्यूज आणि न्यूजप्रिंटवर अजय देवगन ९५.९८ गुणांसह प्रथम क्रमांकावर पोहोचलाय. तर सलमान खान ७५. २४ गुणांसह दुस-या स्थानावर आहे. विशेष म्हणजे अजयने बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकलं आहे. अमिताभ बच्चन ४९.५३ गुणांसह तिसऱ्या स्थानवर आहेत. तर अक्षयकुमार ३१.९८ गुणांसह अक्षय चौथ्या पदावर आहे. लिव्हिंग लिजेंड रजनीकांत २६.१७ गुणांसह लोकप्रियतेत पाचव्या स्थानावर आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tanhaji the unsung warrior movie ajay devgan the rise in popularity ssj