यंदाचा तन्वीर सन्मान पुरस्कार ज्येष्ठ लेखक सतीश आळेकर यांना जाहीर

येत्या ९ डिसेंबरला पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Tanveer Sanman
यंदाचा तन्वीर सन्मान पुरस्कार ज्येष्ठ लेखक सतीश आळेकर यांना जाहीर

डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा मुलगा तन्वीरच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा तन्वीर सन्मान पुरस्कारासाठी यंदा लेखक, दिग्दर्शक सतीश आळेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर नाट्यधर्मी पुरस्कार मुंबई फॅट्स थिएटरचे संस्थापक फैजे जलाली यांना जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दीपा लागू यांनी ही माहिती दिली. यावेळी जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागूदेखील उपस्थित होते.

आळेकरांच्या ‘महानिर्वाण’, ‘मिकी आणि मेमसाहेब’, ‘महापूर’ अशा अनेक नाटकांनी रंगभूमीवर नवीन प्रवाह निर्माण केला आहे. त्यांच्या अनेक नाटकांचे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये भाषांतरही झाले. तर फैजे जलाली या अभिनेत्री, शिक्षिका, लेखिका म्हणून कार्यरत आहेत.

एक लाखाची रक्कम व सन्मानचिन्ह असे तन्वीर सन्मान पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ९ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tanveer sanman and natyadharmi award announced rupvedh pratishthan