तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात…; ‘पाहिले न मी तुला’मधील अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्री झाली भावूक

Tanvi Mundles, Tanvi Mundles father, Tanvi Mundle father, Tanvi Mundle father passed away,

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील अभिनेत्री तन्वी मुंडलेच्या वडिलांचे निधन झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वीचे वडील प्रकाश मुंडले यांनी २४ ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. तन्वीने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने भावनिक पोस्ट लिहिली आहे.

तन्वीने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत, ‘तु माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे. खुप प्रेम आबु’ असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

तन्वीने आजवर अनेक नाटकांनामध्ये काम केले आहे. ती ‘पहिले न मी तुला’ या मालिकेत मानसीची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tanvi mundles father passes away shares the tragic news with fans avb

ताज्या बातम्या